राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
सहा शाळांना आदर्श पुरस्कार

जालना/प्रतिनिधी, दि 11
जालना : येथील १०० शिक्षक क्लब तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि. ८ जानेवारी रोजी जालना शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला. पुरस्कारार्थी शिक्षकांचा व शाळांचा सन्मान करण्यासाठी जालना शहर मनपा आयुक्त संतोष खांडेकर,शिक्षणाधिकारी मंगलताई धुपे, बालसाहित्यिक विशाल तायडे,उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख, गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, विस्तार अधिकारी सुभाष भालेराव, एमजी जोशी, एस एन कुलकर्णी, प्रा.ज्योती धर्माधिकारी,डॉ. पद्माकर सबनीस, डॉ. प्रदीप हुशे, उदय शिंदे व आर आर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कारार्थी शिक्षकांचा मानाचा फेटा, आकर्षक सन्मानचिन्ह व फ्रेम केलेले प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. देखण्या व लक्षवेधक पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन बघून राज्यातून आलेले शिक्षक भारावून गेले होते. आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती तर आलेल्या पुरस्कारार्थी शिक्षकांना सन्मानाने गुलाब पुष्प देऊन स्वागत करून सन्मानाने फेटे बांधले गेले व भारतीय संस्कृतीच्या अतिथी देवोभव उक्तीप्रमाणे औक्षण करून सभागृहात नेमून दिलेल्या जागेवर आदराने बसविण्यात आले.
यावेळी शिक्षणाधिकारी धुपे, बालसाहित्यिक तायडे व प्रा. जोशी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, पुरस्कार बळ व प्रेरणा देण्याचे काम करतात. तेव्हा येणाऱ्या काळातील येणारी नवनवे आव्हाने ओळखून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नवनवे उपक्रम राबवावेत.ज्यामुळे विद्यार्थी आपल्या स्वतः च्या पायावर भक्कमपणे उभा राहिला पाहिजे. तत्पूर्वी १०० शिक्षक क्लबचे अध्यक्ष राजेभाऊ मगर व निवड समितीचे अध्यक्ष आर आर जोशी यांनी समुहाच्या कार्याची व पुरस्कार निवड प्रक्रियेबद्दल माहिती दिली.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील २८ शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात १४ शिक्षक जिल्हा परिषदेचे व १४ शिक्षक खाजगी संस्थेतून निवडण्यात आले होते. त्याचबरोबर सहा शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. शिवनंदा मेहेत्रे,जिप प्रशाला मुलांची,जालना व दिपाली सतीश सावंत,जिप प्राथमिक शाळा,शेकापूर (बाई) जि. वर्धा यांचा आणि डॉ. प्रदीप हुशे, डॉ. बळीराम बागल, प्रा.श्रीकांत चिंचखेडकर, प्रकाश कुंडलकर, भिमाशंकर आप्पा दारूवाले व कैलास आप्पा गबाळे यांचाही आरोग्य,शैक्षणिक सामाजिक कार्यातील योगदानासाठी विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब मुळे यांनी तर आभार प्रदर्शन साजिद खान पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संदीप इंगोले, विष्णू बिरादार, दिपक चाटे, दत्तात्रय राऊतवाड,जगन वाघमोडे, विजय निकाळजे, साजिद खान पठाण, अशोक माधवले,विलास जमधडे, माया कवानकर, मनिषा पाटील,कविता दाभाडे, शुभांगी लामधडे, सविता तायडे, प्रभा जाधव यांनी परिश्रम घेतले तर नियोजनाची जबाबदारी जमीर शेख,पीजी बोराडे, दत्तात्रय देशमुख, रामेश्वर अंबेकर, संतोष लिंगायत, जगदीश कुडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी पार पडली.यावेळी खालील शिक्षक व शाळांना पुरस्कार देण्यात आले. सारिका जालिंदर चंदनशिवे,जिल्हा परिषद प्रशाला,जागजी ता.जि. धाराशिव,सविता सदाशिव आढाव,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जांभुळपाडा ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, अरुणा नामदेव पवार,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंचाडे ता. जि. धुळे , रोहिणी चंद्रकांत पिंपरखेडकर ,जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा, कुंभेफळ, ता.जि. छत्रपती संभाजीनगर, वर्षादेवी बाजीराव कन्नाके ,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मेंढा (किरमिटी) ता. नागभिड जि. चंद्रपुर,सफिया अहेमद अब्दुल पटेल,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुपेवाडी ता. बदनापूर जि. जालना, राजेश बाबाराव इघारे,जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मंगरली, केंद्र – लेंडेझरी ता. तुमसर जि. भंडारा, राजेंद्र ज्ञानदेव कडव, जिल्हा परिषद केंद्र शाळा,गंगापुर ता. भुदरगड जि.कोल्हापूर, राजन गौतम गरुड,जिल्हा परिषद शाळा , बोरीचापाडा जि.पालघर, देवेंद्र कुमार जगन्नाथ बोरसे, जिल्हा परिषद शाळा, सिंदिपाडा – १ , ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार, पद्माकर बाबुराव गोंडगे , जिल्हा परिषद प्रशाला, देऊळगाव गात ता. सेलू जि. परभणी, गोविंद नागोराव शिंदे , जेएसपीएम लातूर द्वारा संचलित,स्वामी विवेकानंद विद्यालय,कळंब रोड, लातूर जि. लातूर , संदीप तात्यासाहेब माने,मुलुंड विद्यामंदिर ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, मुलुंड जि. मुंबई,सुनील भाऊराव वानखडे, अनुसूचित जाती मुलींची शासकिय निवासी शाळा,शेळद ता. बाळापूर जि.अकोला,शरद नंदराम औरंगे, श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित – इंदिरा गांधी हायस्कूल, नांदेड जि. नांदेड, संजय पुंडलिक खंडार,श्री. सत्यसाई विद्यामंदिर,अंबिका नगर, नागपूर जि. नागपूर, मिलिंद नारायणराव पंडागळे, कै. नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालय, चंदनझिरा, जि. जालना, पवन प्रभाकरराव कुलकर्णी,
रामचंद्र किनगावकर प्रा. विद्यालय, योगेश्वरी नगर, जुना जालना जि. जालना स्वाती जितेंद्र देसाई, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, भुईंज जि. सातारा, शोभा केशव जाधव, लोकनेते राजारामबापू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, कवठेमहांकाळ जि. सांगली, अनघा जितेंद्र सासवडकर, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राहुरी, जि. अहिल्यानगर, वंदना रमेश ठाकरे ,सेंट्रल पब्लिक स्कूल, मेहकर जि. बुलढाणा, दिपाली एकनाथराव बारगजे, सहशिक्षिका – शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंत प्राथमिक विद्यालय, बीड जि. बीड व मंदाकिनी खलसे, संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, शाकुंतलनगर,जालना जि. जालना. तर ” नई तालीम व्दारा संचलित, आनंद निकेतन विद्यालय, सेवाग्राम जि. वर्धा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, थुगांव जि. नागपूर, शांती निकेतन विद्यामंदिर, संभाजीनगर, जालना जि. जालना , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , बारसवाडा ता.अबंड जि. जालना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,श्रीरामतांडा ता. मंठा जि. जालना व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरा रोषणगांव ता. जि. जालना