तोष्णीवाल महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

हिंगोली/प्रतिनिधी, दि.21
सेनगाव येथील श्री.गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, येलदरी (कॅम्प) संचलित तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष मा.श्री.बी.आर. तोष्णीवाल तर मुख्य अतिथी म्हणून माजी सनदी अधिकारी मा. श्री. अविनाशजी धर्माधिकारी सर तसेच सेनगाव नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. गायत्री गजानन देशमुख, उपाध्यक्ष मा. श्री.सुभाषअप्पा एकशिंगे, सचिव मा.श्री.यू.एम.शेळके,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री. रमणजी तोष्णीवाल, प्राचार्य डॉ. एस.जी. तळणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर सत्कार सोहळ्यात बारावी विज्ञान शाखा प्रथम माधव बियाणी (कै अयोध्याबाई तोष्णीवाल स्मरणार्थ 3100/- रुपये रोख व प्रमाणपत्र), बारावी कला शाखेतून इंग्रजी विषयास सर्वाधिक गुण कु.मोनिका कांबळे (स्व.दत्तोपंत सबनीस स्मरणार्थ 501/- रुपये व प्रमाणपत्र ),बारावी कला शाखा प्रथम कु.मोनिका महेंद्र कांबळे (स्व.दत्तोपंत सबनीस स्मरणार्थ 501/-रुपये रोख व प्रमाणपत्र), बारावी मराठी विषयात सर्वाधिक गुण कु.अश्विनी हरण (कै. कुंडलिक फड स्मरणार्थ 1001/- रुपये रोख व प्रमाणपत्र),बारावी वाणिज्य शाखेत सर्वप्रथम कु. अंभोरे आराधना (कै. दाजीबाराव इंगोले स्मरणार्थ 1001/- रुपये रोख व प्रमाणपत्र),बी.ए.तृतीय वर्षात मराठी विषयात प्रथम कु.शामा बालाजी चव्हाण (कै.दत्तात्रय टापरे स्मरणार्थ 501/- रुपये व प्रमाणपत्र), एम. ए.मराठी द्वितीय वर्षात प्रथम संतोष आत्माराम कापसे (कै. लक्ष्मीबाई निर्मले स्मरणार्थ 501/- रुपये व प्रमाणपत्र),बारावी हिंदी विषयात सर्वाधिक गुण कु.वाकळे अस्मिता (कै. रामभाऊ पजई स्मरणार्थ 1100/- रुपये रोख व प्रमाणपत्र),बारावी कला शाखेत प्रथम कु मोनिका कांबळे (गुरुकृपा इलेक्ट्रिकल सेनगाव 201/- रुपये रोख व प्रमाणपत्र), बारावी इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण कु अश्विनी हरण (पत्रकार राजकुमार देशमुख यांच्या वतीने 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र),कला शाखेत बारावी सर्वप्रथम कु. मोनिका कांबळे (कै किसनराव घन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र),बारावी विज्ञान शाखेत प्रथम माधव अमोल बियाणी( कै.लक्ष्मीबाई घन स्मृतीप्रित्यर्थ 501/- रुपये व प्रमाणपत्र)कु. मोनिका कांबळे (कै. व्यंकटराव नवगणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1100/- रुपये रोख व प्रमाणपत्र),बी.ए.द्वितीय वर्षात इतिहास विषयात प्रथम कु. वृंदावणी तारे (कै गंगाराम अंभोरे स्मृती प्रित्यर्थ 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र),बी ए तृतीय वर्षात इंग्रजीत प्रथम लक्ष्मण पवार (कै सखाराम गोरे स्मरणार्थ 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र),बारावी तिन्ही शाखेत सर्वप्रथम माधव अमोल बियाणी (कै. भिकाजीराव वलेकर स्मृती प्रित्यर्थ 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र),बारावी विज्ञान शाखेत प्रथम माधव अमोल बियाणी (स्व. गंगाराम गुंजकर स्मृती प्रित्यर्थ 501/-रुपये रोख व प्रमाणपत्र) बी.एस्सी.तृतीय वर्ष पदार्थ विज्ञान शास्त्रात सर्वाधिक गुण कु. गायत्री चोपडे (स्व. रमाबाई जोशी स्मृती प्रित्यर्थ 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र) बारावी पदार्थ विज्ञान शास्त्रात सर्वाधिक गुण माधव अमूल बियाणी( स्व.राजाभाऊ डांगे स्मृति प्रित्यर्थ 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र), बारावी वाणिज्य शाखेत प्रथम कु. आराधना अंभोरे (स्व.कमलाबाई तोतला स्मृती पुरस्कार 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र),नीट परीक्षा २०२४ मध्ये 626 गुण प्राप्त कु. सिद्धी संजय घवाड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव प्रवेशित (कै.जगदीश तिवारी स्मरणार्थ 1001/-रुपये रोख व प्रमाणपत्र ), बारावी इंग्रजी विषयात प्रथम कु.अश्विनी हरण (कै.भाऊराव होडबे स्मरणार्थ 501/-रुपये रोख व प्रमाणपत्र), बारावी ग्रंथालय विषयात सर्वप्रथम आदर्श मोरे (रंगनाथ सखारामजी कठाळे यांच्या वतीने 501/-रुपये रोख व प्रमाणपत्र),बारावी रसायनशास्त्र विषयात सर्वाधिक गुण फंदे नागेश ज्ञानेश्वर (कै.किसनराव रामराव कऱ्हाळे स्मरणार्थ 201/- रुपये रोख व प्रमाणपत्र), बी कॉम तृतीय वर्षात अकाउंट विषयात सर्वाधिक गुण कु. प्रत्युषा प्रमोद घन(कै. ओंकार रामलालजी अग्रवाल स्मृती प्रित्यर्थ सिल्वर मेडल), बी.कॉम.तृतीय वर्षात सर्वाधिक राम कैलास काबरा (डॉ. संजीवकुमार अगरवाल यांच्या नावे सिल्वर मेडल), बारावी दुग्धशास्त्र विभागात प्रथम वैष्णवी उमेश गुठ्ठे व कु. निकिता गणेश गीते(कै.श्रीपाद मुळे यांच्या स्मरणार्थ डॉ.गोविंद भालेराव यांच्या वतीने 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र), महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा प्रथम कु. जानवी रहाटे (301/- रुपये रोख व प्रमाणपत्र), महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा द्वितीय कु. मस्के भागवत महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा द्वितीय (201/- रुपये रोख व प्रमाणपत्र) कु. फटांगळे अस्मिता महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा तृतीय (101/- रुपये रोख व प्रमाणपत्र),माहेश्वरी शिक्षण विकास संस्था,नांदेड निबंध स्पर्धा प्रथम कु. मसडे पूनम (1100/-रुपये रोख व प्रमाणपत्र),राऊत आदर्श उत्तमराव द्वितीय( 751/- रुपये रोख व प्रमाणपत्र) कु.खंदारे अंजली तृतीय (501/- रुपये रोख व प्रमाणपत्र),आंतर विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धा सहभाग कु.साक्षी देवकते (प्रा. हेमंत शिंदे क्रीडा विभाग सेनगाव यांच्या वतीने 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र),राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा द्वितीय कु. रूपाली शिंदे(प्रा. हेमंत शिंदे क्रीडा विभाग सेनगाव यांच्या वतीने 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र), राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा द्वितीय कु. रूपाली शिंदे (कै. रुस्तुमराव देशमुख सेनगाव यांच्या वतीने 501/- रुपये रोख व प्रमाणपत्र) या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित असा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे संचलन प्रा.आर.एस.सबनीस,प्रा.टी.यू. केंद्रे,डॉ.डी.जी.सावंत यांनी तर आभार प्रा एस.बी.फड यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.