“दिव्यांग जागतिक दिनी” शासन, प्रशासन जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आक्रोश मोर्चाने दिव्यांग दिन साजरा करण्यासाठी सहभागी व्हा- चंपतराव डाकोरे पाटील

नांदेड/प्रतिनिधी,दि.26
दिव्यांगाना न्याय हक्कासाठी नांदेड चे जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत सात वेळा बैठक व आठव्या वेळी सुनावणी घेऊन दिव्यांगाना न्याय देण्याचा प्रयत्न करुन एकाही प्रश्नाला संबंधित अधिकारी न्याय देत नसल्यामुळे दि.३ डिसेंबर२०२४ दिव्यांग जागतिक दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति समिती नांदेड व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेड ने अनेक सवलतीसाठी शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक सवलती हक्कासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासुन जिल्हापरिषद नांदेड, महानगरपालिका नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे, संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग,वृध्द, निराधार बांधवांनो जागे होने काळाची गरज आहे.
आज आपण संघटित नसल्यामुळे आपणास संघर्ष करताना खुप त्रास होत असतानाहि आपण अनेक आंदोलने करीत असतो पण वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून सर्व एकत्रित आपली शक्ती दिसत नसल्यामुळे प्रशासन लोकप्रतिनिधी, आपल्या हक्कासाठी लक्ष देत नाहीत सर्व सवलती फक्त कागदोपत्री दिव्यांगाचे राहातं असतात व नुकतीच झालेल्या निवडणुकीत एकाही उमेदवारांनी जाहिरनाम्यात किंव्हा जाहिर भाषणात उपेक्षित असलेल्या दिव्यांग, वृध्द निराधाराचा शब्दाने उपेक्षिताचा उच्चार केला नाही आपली गणिती नसल्यामुळे आपली संघटितपणे संघर्षात शक्ती निर्माण झाल्याशिवाय आपनास न्याय हक्क मिळणार नसल्यामुळे सर्वांनी जागे व्हा ईतरांना जागे करून ३ डिसेंबर २०२४ रोजी दिव्यांग जागतिक दिनी काळा दिवस म्हणून आक्रोश मोर्चाने आपली शक्ती दाखविण्यासाठी मोर्चात सहभागी व्हा असे आव्हान बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति समिती नांदेड व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र च्या वतीने राहुल साळवे, चंपतराव डाकोरे पाटील, सुधाकर पिलगुंडे,ज्ञानेश्वर नवले, राजाभाऊ शेरकुरवार, चांदराव चव्हाण मिंलिद चिगोटे,विद्याधर गिरी,ऊतम चिगोटे,चांदुगोरटकर,
उमेश भगत,मगदुम शेख,अनिल रामदिनवार,दिंगबर लोणे इत्यादी कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान केले