0
3
1
8
4
4

जालना/ प्रतिनिधी,दि.07
पत्रकारांनी बातमीची खात्री करून सत्य आणि अचूक अशी बातमी आपल्या दैनिकातून प्रकाशित करावी जेणेकरून एखाद्याच जीवन उध्वस्त होणार नाही व समाजात प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन आमदार तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी दैनिक गोकुळनिती तर्फे दर्पण दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमा प्रसंगी केले.
जालना येथील दैनिक गोकुळनितीच्या वतीने 6 जानेवारी 2025 रोजी कलश सीड्स येथील सभागृहात दर्पणदिन निमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष विकास बागडी हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जालना विधानसभा आमदार तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील ड. बाबासाहेब इंगळे, ड. महेश धन्नावत, ड. लक्ष्मण उढाण, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, कार्यक्रमाचे आयोजक दैनिक गोकुळनिती संपादक अर्पण गोयल यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, एखादी चुकीची बातमी एखाद्याचा आयुष्य उध्वस्त करू शकते त्यामुळे बातमीची खात्री झाल्याशिवाय बातमीची सत्ता त्या पाहिल्याशिवाय पत्रकारांनी ती प्रकाशित करू नये किती मोठी बातमी असली तो लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ती लपवू शकत नाही आणि आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे, समृध्द व सुसंस्कृत महाराष्ट्र आहे त्यामुळे ही परंपरा आपण जपली पाहिजे एखादी चुकीची बातमी ही आपल्या घरच्या विरोधात कोणी छापली तर ते आपल्याला किती वाईट वाटेल त्यामुळे बातमीची सत्यता तपासून बातमी प्रकाशित करावी. स्वातंत्र्याच्या लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत पत्रकारांचे खूप मोठे योगदान आहे पत्रकारांच्या सत्य बातमीमुळे शिवाजीराव निलंगेकर, बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्री पदावरून देखील पायउतार व्हावा लागला अशी अनेक उदाहरणे या महाराष्ट्रात देता येतील असे त्यांनी सांगितले. अर्पण गोयल हे काय रासायन आहे हे मला अजून देखील कळालेले नाही परंतु त्याच्या लिखानातून शहरासाठी त्याची असलेली तळमळ दिसून येते आणि सर्व पत्रकारांना एकत्रित करावं या उद्देशाने आजचा जो दर्पण दिनाचा कार्यक्रम घेतला तो भविष्यात ही अशाच प्रकारे घेत राहावे अशा शुभेच्छा यावेळी गोयल यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे म्हणाले की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांचे गणिती केली जाते तो चौथा स्तंभ आणखी मजबूत झाला पाहिजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या युगातही वृत्तपत्रांचे महत्त्व कमी झाले नाही इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या द्वारे बातमी ही काही मिनिटातच अनेकांपर्यंत पोहोचवली जाते. यावेळी मनोगत व्यक्त करताना ड. महेश धन्नावत म्हणाले की सत्य बातमी प्रकाशित करीत असताना पत्रकार अनेक वेळा पत्रकारांना वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरे जावे लागते वेळप्रसंगी, त्यांच्यावर हल्ले देखील होतात, त्यांना न्यायालयात देखील जावे लागते अशा या सर्व प्रसंगात पत्रकारांसोबत वकील संघ आणि वकील उभे आहेत त्यांच्या खर्या लढ्यामध्ये वकील त्यांना साथ देतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना विकास बागडी म्हणाले की अॅक्रीडेशन कार्डधारकांना बस प्रवासात सवलत मिळते त्यासोबत त्यांच्या परिवाराला देखील सावलत देण्याची मागणी त्यांनी यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांच्या अडचणीच्या काळात आपण नेहमी त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहून तसेच पत्रकारांनी दर्पण दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम राबवावे असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी ड. लक्ष्मण उडान ज्येष्ठ पत्रकार अंकुश आप्पा देशमुख यांची समायोचीत भाषणे झाली. यावेळी प्रास्ताविक करताना आयोजक अर्पण गोयल म्हणाले की मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती. ’दर्पण’ च्या रुपाने मराठी पत्रकारितेचे जे बीजारोपण आचार्य यांनी केले त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि यात सर्व पत्रकारांचा वाटा आहे याचा मला अभिमान आहे. अचूक भिडे काळजाला भेट मनावर वार जो पोचतो आरपार लोच खरा पत्रकार। शोषितांचा तो आधार वेदना पुसे हळूवार दीनदुबळ्यांचा तारणाहार तोच खरा पत्रकार॥ पत्रकारांनी केलेल्या कार्याची पावती दर्पण दिनानिमित्त लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था व इतर संस्थांनी करणे अपेक्षित होते परंतु अलीकडच्या काळात पत्रकारांना अत्यंत हेड दर्जाची वागणूक मिळत असल्यामुळे समाजातील प्रतिष्ठा कमी होत चालली आहे त्यामुळे या पत्रकार सन्मानाचे कार्य पत्रकारांना स्वतःच करावे लागत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत दानम यांनी केले तर आभार भरत मानकर यांनी मानले. यावेळी पत्रकार गोविंदप्रसाद मुंदडा, राजेश भालेराव, आयेशा खान मुलानी, विनोद काळे, भगवान साबळे, गुलाब पाटील, राजेश भिसे, संतोष भुतेकर, दिलीप पोहनरकर, अच्युत मोरे, सौ. करुणा मोरे, सुयोग कुलकर्णी, विष्णू कदम, अभयकुमार यादव, परस नंद, भारत एखंडे, लेविदास निर्मळ, इलियास लखारा, ओमप्रकाश शिंदे, शेख इलियास, देवचंद सावरे, अतुल व्यवहारे, अनिल व्यवहारे, जावेद तांबोळी, मजहर सौदागर, गौतम वाघमारे, लक्ष्मीचंद जांगडे, विलास खानापुरे, अंकुश गायकवाड, विष्णू नाझरकर, कादरी हुसैन, युवराज कुरिल, सुभाष जिगे, पुंजाराम शेरे, अशोक मिश्रा, सिराज रंगरेज, ज्ञानेश्वर ढोबळे, बालाजी अडियाल, अजय देशपांडे, गोपाल गोमतीवाले, आनंद शिंदे, सुनिल नरवडे, रामू पडघन यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
1
8
4
4