अनिल शांताराम मुंबईकर सेवानिवृत्त

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2
उरण तालुक्यातील एनएडी या कंपनीचे जुनिअर मॅनेजर, वेश्वि येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल शांताराम मुंबईकर हे एनएडी मध्ये ३७ वर्षे सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वेश्वि येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष स्थानी हभप गोपीनाथजी ठाकूर (एनएडीचे माजी युनियन लीडर ), पनवेल मनपा चिटणीस शंकरशेठ म्हात्रे, एकनाथ मोकल, एनएडीचे जुनिअर मॅनेजर प्रवीण कर्पे,सुनंदाताई पेढमकर, वेश्विच्या नवनिर्वाचित सरपंच प्रमिला महेंद्र मुंबईकर,अपर्णा मुंबईकर,त्रिंब्यकशेठ मुंबईकर, सिडको युनियन माजी अध्यक्ष रोहिदास मुंबईकर, जयराम मुंबईकर, गुणवंत कामगार विलास मुंबईकर, सुधीर मुंबईकर, परशुराम घरत, वैजनाथ मुंबईकर, सुहास मुंबईकर, डी आर ठाकूर, ज्ञानदेव ठाकूर, रामनाथ मुंबईकर, संध्याताई मुंबईकर, ऍड विनायक मुंबईकर, ऍड नितीन मुंबईकर, हरिदास मुंबईकर, नुर्तेन मुंबईकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांनी अनिल मुंबईकर यांचे कार्य,विचार व त्यांनी केलेला संघर्ष याविषयी माहिती दिली. व अनिल मुंबईकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एनएडीच्या विविध कामगार संघटना, वेश्वि ग्रामस्थ, मुंबईकर कुटुंबिय या सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित होते. प्रेमळ, मनमिळावू, सर्वांना सोबत घेउन जाणारे, शांत, संयमी नेतृत्व असल्यामुळे विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी सदस्य, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ आदींनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठी गर्दी केली होती.