प्रतिभा माध्यमिक विद्यालयात नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पध्दतीने..
240 विद्यार्थ्यांनी केले मानवी साखळीतुन WELCOME 2024 कृती.

जालना/प्रतिनिधी, दि.2
बदनापूर : तालुक्यातील काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा ता.बदनापूर जि. जालना या शाळेत नव्या वर्षाचे स्वागत आज अनोख्या विद्यार्थी मानवी साखळी पध्दतीने साजरे करण्यात आले.
आज दि. 01/01/2024 रोजी शाळा नेहमीप्रमाणे 10. वा.भरली ती “नवीन वर्ष नवीन संकल्पना” ही कल्पना घेऊन. शाळेतील शिक्षकांच्या विचारातून आणि जवळ जवळ 240 विद्यार्थ्यांच्या कृतीतून आज शाळेच्या भव्य प्रांगणात विद्यार्थी मानवी साखळी तयार करून नव्या वर्षाचे स्वागत एका नव्या अनोख्या पद्धतीने करण्यात आले. 240 विद्यार्थ्यांनी ‘WEL COME 2024’ अशा इंग्रजी अक्षरांची मानवी साखळी तयार करून नव्या वर्षाचे स्वागत केले.या नव्या संकल्पनेचे काजळा व परीसरातील गावातील प्रतिष्ठित नागरिक,पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे.यावेळी शाळेतील मुख्यध्यापकासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.