महापुरुषांना अभिवादन करून घर प्रवेश.
आगळ्या वेगळ्या गृह प्रवेशाची सर्वत्र चर्चा चांगला आदर्श समाजात केला निर्माण.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
हेच आमचे गुरु इथूनच आमचे अस्तित्व सुरु असे ब्रीद वाक्य उराशी बाळगून स्वर्गीय जनाबाई मारुती नागु म्हात्रे यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते समीर रामचंद्र म्हात्रे रा.पागोटे-उरण यांच्या नविन घराचे गृह प्रवेश महापुरुषांना विनम्र अभिवादन करून करण्यात आले.यावेळी सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार सहकुटुंब उपस्थित होते. व सर्वांनी समीर म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आज अनेक ठिकाणी विविध धार्मिक विधी करून गृह प्रवेश केला जातो. पण समीर म्हात्रे हे पुरोगामी विचाराचे असल्याने त्यांनी आधुनिक युगाचा विचार करत, समाजात प्रबोधन करण्याच्या दृष्टीकोणातून महापुरुषांना अभिवादन करत गृह प्रवेश केला. त्यांच्या या गृह प्रवेशाची सर्वत्र चर्चा होत आहे.एक चांगला धाडसी व उत्तम निर्णय घेतल्याने समीर म्हात्रे यांच्या निर्णयाचे, कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.