
0
3
1
8
4
5


जालना/प्रतिनीधी,दि.14
दे शभरात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होणार आहे.या निवडणुकीचे निकाल जसे समोर येईल त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते अग्निविर ठरतील.निकालानंतर भाजपा सुद्धा त्यांना दूर सारतील असे भाकीत काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंटयाल यांनी आज मंगळवारी येथे बोलतांना व्यक्त केले.
जालना लोकसभेसाठी काल सोमवारी मतदार संघात ६९.१८ टक्के असे उत्स्फूर्त मतदान झाले आहे.या वाढलेल्या मतांचा लाभ नेमका कुणाला होईल असे उपस्थीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने फोडले,आमदार फोडले आणि चिन्हंही पळवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्हिलन ठरले असून या सर्व घडामोडी पाठीमागे भाजपाचा हात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपा विषयी सर्वसामान्य जनतेत मोठी चीड निर्माण झाली. हे सर्वसामान्य नाराज मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला.महागाई,बेरोजगारी,शेतकरी ,मजूर,कामगारांचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश,केंद्र,राज्यातील सरकारची जुमलेबाजी, मराठा,ओबीसी,मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा यातून केंद्र आणि राज्यातील सरकारविरुद्ध जनतेत मोठा रोष निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनतेने या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला असल्याचे झालेल्या उत्स्फूर्त मतदानातून दिसून येत असल्याचे स्पष्ट करून आ.गोरंटयाल म्हणाले की,आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे सर्व नेते,पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवून त्यांच्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत.ही निवडणूक एकतर्फी होईल असे भाजपाला सुरुवातीला वाटत होते.मात्र,जनतेचा कल आपल्या विरुद्ध असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा जालन्यात घेतल्या.मात्र त्याचा काहीही फरक पडणार नाही.शिवाय भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या सिल्लोड आणि जालन्यातील मलिदा सम्राटांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध काम केल्याची चर्चा आहे.तसे जर खरच झाले असेल तर दानवे यांचा पराभव निश्चित असल्याचे सांगून आमचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या विजयाच्या संदर्भात सध्या आम्ही जो अंदाज व्यक्त करत आहोत त्यापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आ.कैलास गोरंटयाल यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला आहे.
भाजपाला श्रीरामांची नाराजी भोवणार
अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर मागील दोन लोकसभा निवडणुकी सारखे वातावरण देशात निर्माण होईल अशी खात्री भाजपाला होती.त्यामुळेच श्रीराम मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी भाजपाने घाई केल्याचे आ.कैलास गोरंटयाल म्हणाले.ज्या दिवशी लोकार्पण करण्यात आले त्या दिवशीचा मुहूर्त बरोबर नाही,शिवाय मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने आणि हिंदू शास्त्रानुसार श्रीराम मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी हिंदू धर्मात सर्वोच्च असणाऱ्या चार शंकराचार्यांनी विरोध दर्शवला होता.मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विरोधाला जुमानले नाही.ज्या श्रीरामांचे नावं घेवून आतापर्यंत सत्ता भोगली त्याच श्रीरामांची नाराजी भाजपाला आता भोगावी लागणार असल्याचा टोला आ.कैलास गोरंटयाल यांनी यावेळी बोलतांना लगावला आहे.
5/5 - (1 vote)
0
3
1
8
4
5