घराणेशाही धनदांडग्यांना पक्षबदलु उमेदवारांना शह देण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी 288 मतदार संघात उमेदवार उभे करणार _ प्रा.सदाशिव भुयारे

नांदेड/प्रतिनिधी,दि.13
नांदेड शहरातील चैतन्य नगर भागातील सौभद्र मंगल कार्यालय येथे दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी अनेक उपेक्षित राजकिय,सामाजिक, सेवाभावी संस्था अनेक
संघटना, पदाधिकारी कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचे निमंत्रक त्याचा अण्णाभाऊवादी कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉम्रेड प्रा.सदाशिव भुयारे हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून दिव्यांचा, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर,ओबीसी संघर्ष योद्धा तथा पुरोगामी ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. सुरेश घुमटकर , दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे, अण्णाभाऊवादी कम्युनिस्ट पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस कॉम्रेड राहुल गजलवाड, प्रजादर्पण चे कार्यकारी संपादक मधुकर इंगळे पाटील,आदित्य पाटील, पत्रकार अरविंद भोरे,प्रा.मंगेश देवकांबळे, अण्णाभाऊवादी स्टुडंट्स फेडरेशनचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष कॉ.राज सूर्यवंशी, प्रा दत्तात्रेय हाळदे मारोती बरमे,शैलेश गजभारे, अंतेश्वरीताई बंदुके, सूर्यवंशी सर, विलास वाघमारे,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या चिंतन बैठकीमध्ये आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
सर्वानुमते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
असे प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने देण्यात आले