विद्यार्थानी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून करीअर घडवावे श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या स्नेहसंमेलनप्रसंगी आमदार डॉ.उढाण यांचे प्रतिपादन

गणेश शिंदे / विरेगाव,दि 15
विध्यार्थानी शिक्षण घेऊन आपल्याला जे क्षेत्र मनापासून आवडते तेच क्षेत्र करीअर म्हणुन निवडले पाहीजे. पैसा प्रतिष्ठा बाकी काही गोष्टी मिळतील, परंतू त्याच्या मागे न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन घनसावंगीचे आमदार डॉ हिकमत उढान यांनी केले. घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे शुक्रवारी श्री सरस्वती भुवन प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलनात उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार.डॉ.हिकमत उढान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी अध्यक्ष नानासाहेब देशमुख, प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी,शालेय समितीचे अध्यक्ष गौतम देशमुख, मुख्याध्यापक तथा प्राचार्य मधुकर बिरहारे, जिल्हा परिषद सदस्य खालेक कुरेशी उपस्थित हाेते. यावेळी डॉ.उढाण म्हणाले, स्नेहसंमेलन माझा आवडता विषय असून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे. आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड करावी. समाजातील प्रत्येक मुलांनी शिक्षण घ्यावे अशी कै.पद्मविभूषण बद्रीनारायणजी बारवाले यांची इच्छा होती. त्यांचे ऋण नेहमी स्मरणात राहील. शिवाय विद्यार्थ्यांची शिक्षणानेच प्रगती होऊ शकते असे मत नानासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. स्नेहसंमेलनात पहिली ते ९ आणि ११ वी च्या विद्यार्थ्यांनी ५० आविष्कार सादर केले . नाटिका,गितगायान,नृत्य, मुकनाट्य, पोवाडे, देशभक्तीपर फ्युजन गिते, बुरगुंडा, रक्तचरित्र, झाडे लावा झाडे जगवा, जोगवा, गोंधळ, आली वासुदेवाची स्वारी, मुलींचे सक्षमीकरण, पर्यावरण नाटीका सादरीकरण केले सांस्कृतिक कार्यक्रमासह प्रशालेत शालेय क्रीडा स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य मधुकर बिरहारे, जिल्हा परिषद सदस्य खालेक कुरेशी, प्रेमचंद भंडारी, सय्यद शब्बीर हुसेन ,डॉ. सिद्धिविना,विष्णु पाटील उपस्थित होते