विधानसभा मतदार संघातील दिव्यांगासाठी राखिव असलेल्या आमदार निधीपासुन दिव्यांगाना हक्कापासुन वंचित राहावे लागत असल्याने दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र हदगाव , मतदार संघातुन उमेश धोटेची उमेदवारी सर्वानुमते निवड

नांदेड/प्रतिनिधी,दि.6
हदगाव तालुक्यातील पळसा येथे दिव्यांग ,वृध्द, निराधार, शेतमजुर,गायरान,पट्टेधारक, यांची शाखा प्रमुख तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
या बैठकीत येणाऱ्या निवडणुकीत दिव्यांग,वृध्द, निराधार बांधवांनी कोणती भुमीका घेयायची याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
कारण दिव्यांग,वृध्द, निराधारांना न्याय हक्क मिळावा म्हणून अनेक कायदे अधिवेशनात मंजुर केले जातात,तेच लोकप्रतिनिधी कायदा नियम निकष पाळत नसतील तर दिव्यांगासाठि केलेल्या कायदा फक्त कागदावरच ठेवत असतील तर दिव्यांग कायदा 2016चा कायदा कशासाठी ?
निवडणूक आलि कि अनेक उमेदवार मतांची भिक मागताना मी मतदाराचा सेवक आहे.दिनदुबळ्याचा कैवारी म्हणुन मते मागतात सत्तेत गेल्यानंतर दिनदुबळ्या दिव्यांग,वृध्द,निराधाराची साधी त्यांना आठवण येत नाहि. दिव्यांगाच्या समस्या अधिवेशनात कधी मांडत नाहित.
दिव्यांगाना स्वबळावर जीवन जगता यावे म्हणून अधिवेशनात आमदारांनी त्यांच्या मतदार संघात दरवर्षी तिस लाख रूपये निधी देण्याचा निर्णय अधिवेशनात घेऊन तेच पाळत नसतील तर त्यांची आठवण शासन प्रशासनास व्हावी म्हणून दिव्यांग बांधव हक्कासाठी प्रशासनास जागे करण्यासाठी रस्त्यावर आंदोलन,धरने,मोर्चे करताना कधी लोकप्रतिनिधीला ते आंदोलन दिसत नसल्यामुळे ते समोर येत नाहित.
ते फक्त सत्तेत गेल्यानंतर आपल्या दहा पिढीची कमाई करून वंश पिलावळ आपली सत्तेत कशी गेली पाहिजे म्हणून या पक्षातुन त्या पक्षात उडी मारून सत्तेसाठी लाचार झालेल्या उमेदवारांना दिव्यांगानी त्यांची जागा मतदान रूपाने दाखऊन त्यांना सतेपासुन वंचीत ठेवण्यासाठी दिव्यांगानि दिव्यांग होने का गम नाहि ! हम किसी से कम नाहि ? या उक्तीप्रमाणे हदगाव मतदार संघातुन निवडणूक लढविण्याचा विचार सर्वानुमते घेण्यात आला.
कारण दिव्यांग,वृध्द, निराधार, शेतमजुर,गायरान पट्टेधार, सवलती पासुन वंचीत राहावे लागत असल्यामुळे दिव्यांगाचा प्रतिनिधी सत्तेत असला पाहिजे जे आपल्या हक्कासाठी निवडणुकीत हदगाव मतदार संघातुन उमेश धोटे यांना ऊभे करून मतदान रूपाने आपली शक्ती दाखवावी असे सर्वानुमते चर्चेतुन हदगाव तालुक्यातील पळसा व अनेक गावातील बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला .
या बैठकीत प्रवक्ते श्री.सुर्यकांत माळोदे नगरसेवक नगर परिषद हदगाव.अरविंद भोरे , नागोराव डोलनर, नामदेव बोडके,पांडुरंग धनगरे,दिपक बोडके,शिवानंद गिरी, शिवराज महाजन, शंकर कांबळे,शाहिर कांबळे, इत्यादी पदाधिकारी शाखा प्रमुख उपस्थिती होती असे प्रसिध्दीपत्रक दिले