सुरंगली येथे मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त विविध कार्यालयात ध्वजारोहण

सुरंगली/प्रतिनिधी,दि.18
भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे विविध कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. ग्रा.प. कार्यालयात उपसरपंच सौ सुनिता ताई संतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . जि.प.प्रा.शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर काशी विश्वेश्वर विद्यालय येथे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संजिव पाटील, पत्रकार शेख समद भै, नायबराव पाटील, संतोष काळे, रामभाऊ वानखेडे, मुख्याध्यापक अवचित राव सपकाळ,येवले,सिरसाट, गावीत, यांची उपस्थिती होती. जि.प.शाळेत आणि ग्रा.प.ध्वजारोहणास जि.प.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू साक्रुबा दांडगे, मुख्याध्यापक सपकाळ, अंभोरे सर, सोळुंके , राठोड सर, गिरीसर, शेख एजाज भै, पत्रकार शेख समद भै, पत्रकार सुभाष वर्पे, संतोष काळे, संजय पाटील, ग्रामसेवक पाजगे , पत्रकार संजीव पाटील माजी सरपंच, ग्रा.प.सदस्य शेख रुबाब , संतोष काळे , अंगणवाडी सेविका मंदाताई संजीव पाटील, उषाबाई खोंडे, आरोग्य सेविका सपकाळ , अंगणवाडी सेविका मदतनीस सविताबाई घोडके, निर्मला बाई जाधव, उपसरपंच सौ सुनिता ताई संतोष काळे, ग्रा.प.सदस्य सुभाष गवळी, अरुण गवळी, संदीप मोतीराम दांडगे संगणक परीचालक, अनेक ग्रामस्थ ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते .