बदनापूर तालुक्यात संपूर्णता अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.18
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय- छत्रपती संभाजीनगर, बदनापुर पंचायत समिती तसेच वाकुळणी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने वाकुळणी येथे संपूर्णता अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. 22 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजर राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केन्द्रीय संचार ब्यूरोचे छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालय, बदनापूर पंचायत समिती व वाकूळणी ग्रामपंचायत यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रचारार्थ दि. 22 जुलै 2024 रोजी कार्यक्रमाआधी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दि. 20 व 21 जुलै 2024 रोजी गावात दवंडी देण्यात येणार आहे. या अभियानात निवडक आकांक्षित तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्याकरिता निती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली अशा विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाने आकांक्षित जिल्ह्यांचा जलद आणि प्रभावीपणे कायापालट करण्यासाठी आकांक्षी जिल्हा कार्यक्रम लाँच केला आहे. आकांक्षी जिल्हा कार्यक्रमकडून मिळालेल्या माहितीवर आधारित, 500 ब्लॉक्स समाविष्ट करणारा आकांक्षी ब्लॉक्स प्रोग्राम जानेवारी 2023 मध्ये सुरू करण्यात आला आहे. भारतातील सर्वात अविकसित क्षेत्रांमधील प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निती आयोगाने ही मोहीम सुरू केली आहे. आकांक्षित तालुक्यांमधील सहा निर्देशक सुधारण्यासाठी काम करण्यात येईल. त्यामध्ये प्रसूतीपूर्व काळजीसाठी गर्भवती महिलांची वेळेवर नोंदणी, त्यांना पूरक पोषण आहार, मधुमेह आणि रक्तदाबासाठी आकांक्षित तालुक्यांमध्ये लोकसंख्येची तपासणी करणे, माती आरोग्य कार्ड, बचत गट रिव्हॉल्व्हिंग फंडाची तरतूद आदी तर जिल्हा स्तरावर त्याचे लक्ष्य मुलांचे लसीकरण, माध्यमिक शाळांना वीज किंवा पाठ्यपुस्तके पुरवण्याचा आढावा घेणे अदिचा समावेश असेल. या अभियानाचा कालावधी 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असेल. संपूर्णता अभियान जनजागृती कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांवर तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.