महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये समुपदेशक पदासाठी भरती

जालना/प्रतिनिधी,दि. 3
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जालना विभागात समूपदेशक या पदसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
समुपदेशक 1 पदासाठी भरती असून त्यासाठी शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची /संस्थेची समाजकार्य या विषयात पदूव्यत्तर पदवी (एम.एस. डब्ल्यु.) किंववा मान्यताप्राप्त विद्यापीठाची /संस्थेची मानसशास्त्र विषयातील कला शाखेची पदव्यूत्तर पदवी (एम.ए. सायकॉलॉजी) अधिक समूपदेशक मानसशास्त्र विषयातील पदवीका (मानसशास्त्र विषयाचाअडव्हान्स डिप्लोमा ). अनुभव – समूपदेशक क्षेत्रातील/निम शासकीय/मोठ्या खाजगी संस्थातील किमान 2 वर्षाचा अनूभव. अर्ज करण्याची पध्दत- वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचनी फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलेखीत करुन स्वत:चा फोटो त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा. सदर अर्ज दि. 12 मार्च 2025 पर्यंत खालील पत्त्यावर पोहोचेल या बेताने पाठवावा. पत्ता – विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय, एन.आर.बी. कंपनी समोर, औरंगाबाद रोड, जालना ता. जि. जालना 431203 अशी माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.