जागतिक महिला दिनानिमित्त मतदान जनजागृती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न

जालना/प्रतिनिधी, दि.7
आज दिनांक 07/03/2024 रोजी शासकीय निवासी शाळा बदनापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त मतदान जनजागृती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय घोषवाक्य ,चित्रकला , रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आलेले होते.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा. तहसीलदार श्रीम. डमरे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहुन विद्यार्थी यांना जागतिक महिला दिनानिमित्त व मतदान जनजागृती अभियान संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. गटशिक्षणाधिकारी श्री.क्षीरसागर साहेब उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यासोबत आलेले मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, पालक व कार्यालयातील विषय तज्ञ, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक उपस्थित होते.
द्वितीय सत्रात परीक्षण करून स्पर्धेचे बक्षीस वितरण मा. गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती राठोड मॅडम , मा. गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विषय तज्ञ श्रीमती कल्पना पाटील मॅडम ,श्रीमती मीरा जगदाळे मॅडम , विशेष तज्ञ श्री साईनाथ मदिकुंटावर विशेष शिक्षक श्री. तुकाराम गिरशेट्टी, श्री. अमोल चव्हाण यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल चव्हाण सर यांनी केले
स्पर्धेचे परीक्षक म्हणून
1) घोषवाक्य :- बाबासाहेब नागरे
2) चित्रकला :- शारदा सुखदेव लोखंडे
3) रांगोळी :- नरवाडे छाया बालाजीराव यांनी पाहिले तर विजेते स्पर्धक
घोषवाक्य
प्रथम-दिव्या समाधान कान्होरे शाळा जि.प.प्रा.शा. विल्हाडी,द्वितीय-अरबीना चाँद सय्यद शाळा जि.प.प्रा.शा. सोमठाणा,तृतीय-गायत्री महादेव भोर्डे शाळा जि.प.के.प्रा.शा. काजळा
चित्रकला
प्रथम- पुनम रामेश्वर कानुले,शाळा- शिवाजी विद्यालय बावणे पांगरी,द्वितीय- तेजल मधुकर मेंढरे,शाळा कन्या हायस्कूल बदनापूर,तृतीय-प्रतीक्षा बाबासाहेब म्हस्के,शाळा जि.प.प्रा.शा. म्हसला
रांगोळी
प्रथम – कल्याणी परमेश्वर ठुबे,शाळा शिवाजी विद्यालय पाहुणे पांगरी,द्वितीय-पायल मुरलीधर निहाळ,शाळा जि.प.प्रा.शा. चनेगाव,तृतीय-प्रियंका साळवे,शाळा जि.प.प्रा.शा. विल्हाडी