जि.प.प्रशाला राणी उंचेगाव येथे चित्रकला स्पर्धा संपन्न

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.2
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्या मधील पीएमश्री जि.प.प्रशाला राणीउंचेगाव येथे रविवारी चित्रकला स्पर्धा संपन्न झाली आहे. चित्रकला स्पर्धेत १४८ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. गट अ- ७ ,गट ब- ३६, गट क- ७६,गट ड- २९ असे एकुण १४८ विद्यार्थ्यानी चित्रकला स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. जि.प.प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सुरेश कदम , श्रीमती नूतन मघाडे , श्री गायके , चित्रकला शिक्षक प्रदीप शिंदे , अशोक घुमरे , यांनी शाळेत नियोजन केले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रेरीत केले . शाळेचा स्टाफ श्री खरात , श्री लाड , कांबळे , श्रीमती गुंगे, श्रीमती कदम , श्री पिंपळे , श्री मेश्राम , केदार , राजू पोपळघाट , कव्हळे मामा यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेऊन स्पर्धा व्यवस्थित पार पाडली. लोकमत राणी उंचेगाव येथील लोकमत बातमीदार अशोक घुमरे यांनी दैनिक सकाळ चे राजु अंभोरे,पुंजाराम शेरे यांनी राणी उंचेगाव येथे स्पर्धा होण्यासाठी सहकार्य केले. या स्पर्धेत सहभागी राणी उंचेगाव येथे झालेल्या चित्रकला स्पर्धे साठी कॄष्णनगर तांडा, चापडगांव,तळेगाव, शिंदे वडगांव इत्यादी शाळेचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते. चित्रकला स्पर्धा यशस्वी संपन्न केल्याबद्दल गावच्या सरपंच श्रीमती रत्नाताई बालासाहेब शिंदे , सुभाष भालेराव उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना , गटशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी , केंद्रप्रमुख राजेश सदावर्ते , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास साठी कलेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. कला माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करते. शासनाने शाळेमध्ये कला , क्रीडा , शारीरिक शिक्षण विषयासाठी कला निदेशक देऊन शाळेत आनंददायी वातावरण तयार केले आहे. सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि कला निदेशक यांच्या प्रयत्नातून अनेक सहशालेय उपक्रम शाळेत घेऊन विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साधला जात आहे.”
नूतन मघाडे , अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ , जिल्हा सरचिटणीस महिला विंग जिल्हा जालना.
चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थी मनातील भावना कागदावर व्यक्त करतात. एखादी कला लहानपणापासून विद्यार्थ्यांनी जोपासल्यास , भविष्यात चुकीच्या मार्गाने विद्यार्थी न जाता , कलात्मक संस्काराने मनाचा विकास होऊन सुजाण नागरिक घडू शकतात.”
प्रदीप शिंदे चित्रकला शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राणी उंचेगाव