अंनतवार यांच्या अमरण उपोषणाकडे शासनाचे नवव्या दिवशी दुर्लक्षच ओबीसी समाजाचा पाठिंबा देत ठिक ठिकाणी एल्गार

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.29
दत्तात्रय अनंतवार हे मराठा समाजाला दिल्या गेलेल्या ओबीसी प्रमाणपत्र सरसकट रद्द करण्यात यावेत यासाठी रविवार एकेवीस जुलै पासून कवाना ता.हदगांव आपल्या गावी अमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणास सोमवार एकोणतीस जुलै रोजी नववा दिवस आहे.या उपोषणाला हदगांव हिमायतनगर सह आजुबाजुच्या तालुक्यातील ओबीसी समाज बांधवाकडुन दिवसेंदिवस उपोषणाला वाढता पाठींबा मिळत आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. स्थानिक प्रशासन वगळता लोकप्रतीनीधीसह शासनाने या गंभीर विषयांकडे पाठ फिरवली असल्याने ओबीसी समाज बांधवानी रोष व्यक्त करीत आहे.
दोन दिवसापूर्वीच पालकमंत्री गिरीश महाजन नांदेड दो-यावर होते.त्यांनी उपोषणास भेट देणे किंवा जिल्हा प्रशासनास लक्षात आणून देणे गरजेचे असल्याच्या भावना ओबीसी समाज बांधवाकडुन व्यक्त करीत रोष व्यक्त करीत आहेत. उपोषणकडे वरिष्ठ शासन प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने या उपोषणाचे पडसाद गावपातळीवर उमटत आहेत. जोपर्यंत वरिष्ठांकडून दखल होईपर्यंत माघार घेणार नाही यावर उपोषण कर्ते दत्तात्रय अंनतवार ठाम आहे. या उपोषणाकडे शासन काय भुमिका घेते याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे