दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नांसाठी पहिल्याच बैठकीत अनेक प्रश्नांवर दिड तास चर्चा मां.जिल्हाअधिकारी यांनी प्रत्येक प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर दिले आदेश कनिष्ठ आदेशाची अंमलबजावणी करतील काय? चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड/प्रतिनिधी,दि 18
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या निवेदनाची मा. नुतन जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी सोबत दि.१८ मार्च २०२५ रोजी बैठकिचे आयोजन केले होते या बैठकीत १९ अधिकाऱ्यांना व संबंधित दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल व त्यांच्या शिष्टमंडळा सोबत बैठकित मोजकेचे अधिकारी ऊपस्थीत तहसिलदार, गटविकास अधिकारी,पोलिस अधिकारी, अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत गैरहजर होते.
दिव्यांगांच्या विविध शासन निर्णयीत न्याय मागण्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने आपणास व संबंधित शासकीय विभागास निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढूनही मां.माजी जिल्हाधिकारी राऊत सरांनी सात बैठका व एक सुनावणी घेऊन आदेश व निर्देश दिल्यानंतर एकहि प्रश्नाचे साधे उत्तर मिळाले नसल्यामुळे
दिव्यांगांच्या कल्याणासाठीच्या विविध शासन निर्णयांची व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी न करता नांदेड शहर व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवणा-या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर आरपीडब्ल्यु डी ॲक्ट २०१६ व दफ्तर दिरंगाई कायद्यासह सेवा हमी कायद्या अंतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी यासाठी मा.जिल्हाअधिकारी यांनी दिल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन दि.२० फेब्रुवारी ते १० मार्च २०२५ संघटनेच्या वतीने देण्यात आले.
असता एकाहि अधिकाऱ्यांनी निवेदनाचे साधे उत्तर न दिल्यामुळे दि.१० मार्च २०२५ रोजी मा.जिल्हाअधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देताच मा.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी नांदेड यांनी दि.१८ मार्च २०२५ रोजी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी सोबत बैठकीचे आयोजन केले होते.
दिव्यांग, वृध्द निराधाराच्या प्रश्नाबदल नुतन जिल्हाधिकारी नांदेड यांनी आल्याबरोबर बैठकीचे आयोजन केले खरेच वरीष्ठाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या कनिष्ठाला शिस्त लावतील लावतील बैठकीला आले असते तर दिव्यांगाना खरेच न्याय देतील असे वाटत होते . पण दिव्यांगाचे दु:ख वेदना ऐकण्यासाठी कनिष्ठाला वेळ मिळत नाहि. वरीष्ठ अधिकारी यांचे आदेश न पाळणाऱ्या व दिव्यांचा ना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर मां.जिल्हाअधिकारी काय कार्यवाही करतील दिव्यांग वृध्द निराधाराना न्याय देतील कि असेच दिव्यांगाची अवहेलना होईल हे पुढील काळातच कळेल असे दिव्यांगाच्या बैठकीत मा.जिल्हाअधिकारी, समाज कल्याण अधिकार, जिल्हा पुरवठा अधिकारी ,ईतर अधिकारी,दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, मराठवाडा प्रमुख, सुधाकरराव पिंलगुंडे, दिव्यांग संघटनेचे वकिल धोंडीबा पवार,चांदराव चव्हाण, वैजनाथ आळे,शिवपुजे,विद्यानंद गिरी, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते असे प्रसिध्दी पत्रक दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जि.नांदेड यांनी प्रसिध्दी दिली