रांजणगाव शेणपुंजी येथील स्वामी केशवानंद नगर येथील नागरिक चिखलमय रस्त्यामुळे त्रस्त

छ.संभाजीनगर/अनिल वाढोनकार, दि.5
रांजणगाव येथील स्वामी केशवानंद नगर रस्त्यांची चिखल मय दुरवस्था झालेली आहे यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करताना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे दरवर्षी पावसाळ्यात या सर्व रस्ते चिखलमय होतात परिणामी शाळकरी मुले महिला तसेच कामगारांना या रस्त्यावर येजा करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो पावसाळ्यात नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून चालताना अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पोपटराव भदाणे अंकुश मगर अनिल वाढोणकर संजय पावडे अनिल जाधव सुनील तिडके गंगाधर मोरे उत्तम जाधव बाबासाहेब जंजाळ ठेगडे अरुण पुरी कृष्णा शिंदे आदींनी केली आहे