सुरंगलीचे श्री काशीविश्वेश्वर तीर्थक्षेत्र – एक जागृत शिवालय

भोकरदन/ डॉ. संजीव पाटील,दि.8
भोकरदन:- तालुक्यातील श्री क्षेत्र काशीविश्वेश्वर तिर्थक्षेत्र हे एक जागृत शिवालय असून, हे जूई नदीच्या काठावर वसलेले प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे, अशी अख्यायिका आहे की पुराण काळात श्री शृंगऋषीनी या मंदिरातील महादेवाच्या पिंडीनी स्थापना केली आहे. या मंदिराची एक आख्यायिका आहे ती अशी की पुराण काळात शृंगऋषी येथे वास्तव्याला होते, ते आपल्या सामर्थ्याने दररोज काशी येथे स्नानासाठी जात व त्याच दिवशी परत येत,पण कालांतराने से वृद्ध झाले व एकदा त्यांनी श्री काशीविश्वनाथाला प्रार्थना केली व आपले दंडकमंडलू काशी मध्ये टाकून दिले व म्हणाले मी आता थकलो आहे, तूच आता माझ्याकडे ये,त्यांच्या अराधना ऐकुन श्री काशी विश्वनाथ प्रसत्र झाले आणि एक दिवस ऋषीच्या स्वप्नात काशीतीर्थ आले व म्हणाले आपण व याने थकला आहात, मीच सूरंगळी येथे येते आणि येथील लोकांना पावन होते, एकदा गावाच्या पश्चिमेस गुरे चरत असताना गाईच्या खुराखालून पाणी आले, शृंगऋषीनी गावकऱ्यांना खोदकाम करण्यास सांगितले, खोदकाम सुरू असताना ऋषींनी काशी येथे टाकलेले दंडकमंडलू पाण्यासावत बाहेर आले, खोदकाम करता करता त्या जागेला कुंडाचे स्वरूप ग्राम झाले आणि तेव्हापासून ह्याला काशीकुंड किवा काशीतीर्थ माणू लागले. विशेष म्हणजे हे कुंड आजपर्यंत कधीही कोरडे पडलेले नाही,भर उन्हाळ्यातही येथे पाणी असते, म्हणून श्री काशीविश्वेश्वर एक जागृत शिवालय आहे.
नवसाला पावणारा महादेव म्हणून पंचक्रोशीतही ख्याती आहे. येथे दर सोमवारी, श्रावण सोमवारी, प्रदोष, शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेतात,ह्या ठिकाणी गेली ४२ वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते, सामाहात दररोज अन्नदानाचा (पंगतीचा) कार्यक्रम होतो. तसेच रोज रात्री प्रत्येक समाजाचा पहारा असतो, त्यात भजन, कीर्तन विविध कार्यक्रम होतात. सप्ताहाचे सात दिवस आनंदाने साजरे होतात सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थिती मध्ये श्री काशिविश्वेश्वराला रुद्राभिषेक होतो, श्री शंभू महादेवाची संपूर्ण गावातून टाळ, मृदंगाच्या गजरात पालखी मध्ये मिरवणूक काढली जाते, मध्यरात्री महादेवाची आरती होते,हा प्रमुख उत्सव असल्याने गावातून बाहेरगावी नोकरीसाठी, शिक्षणासाठी, व्यवसायासाठी तसेच लग्न होऊन सासरला गेलेल्या लेकीबाळी गावात शिवरात्री उत्सवा निमित्त येतात, महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गावामध्ये भंडार्याचे आयोजन केले जाते या दिवशी गावामध्ये यात्रा देखील भरते, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गावांमधे भागवत सप्ताह आणि भंडा-याने आयोजन केले आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष, सचिव, समस्त विवस्तानी आणि गावकऱ्यांनी केली आहे.शृंग ऋषीच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीला (काशिविश्वेश्वराला) तिर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्याची मागणी गावकऱ्यानी व भाविक भक्तांनी केली आहे.