जालना जिल्हा हा “टीबीमुक्त पंचायत अभियानात” प्रथम क्रमांकावर; 257 ग्रामपंचायतींनी टीबीमुक्त होण्यासाठी नामांकन दाखल केले

जालना/प्रतिनिधी,दि.8
“क्षयरोगमुक्त भारत” हे ध्येय सन 2025 पर्यंत साध्य करण्यासाठी “टीबीमुक्त पंचायत” हे अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याचा विचार करता राज्यस्तरावरील काम हे 8.4 टक्के असुन त्या तुलनेत जालना जिल्ह्याचे काम 33 टक्के आहे. त्यामुळे जालना जिल्हा हा “टीबीमुक्त पंचायत अभियानात” राज्यात प्रथम क्रमांकावर असून जालना जिल्ह्यात 777 ग्रामपंचायतीपैकी 257 ग्रामपंचायतींनी टीबीमुक्त होण्यासाठी नामांकन दाखल केली आहेत.
पंतप्रधान, भारत सरकार यांचे “क्षयरोगमुक्त भारत” हे ध्येय सन 2025 पर्यंत साध्य करण्यासाठी “टीबीमुक्त पंचायत” हे अभियान राबविण्यास निर्देशित केले आहे. पंतप्रधान, भारत सरकार यांचे “क्षयरोगमुक्त भारत” हे ध्येय सन 2025 पर्यंत साध्य करावयाचे आहे जे की शाश्वत विकास ध्येयाच्या अपेक्षीत कालावधी पेक्षा पाच वर्ष अगोदर आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत टीबीमुक्त ग्रामपंचायत मोहिम राबविण्याबाबत सेंट्रल टिबी डिव्हीजनकडील मार्गदर्शक सुचनेनुसार जालना जिल्हयातील 257 ग्रामपंचायतींना टिबीमुक्त होण्यासाठी नामांकन दाखल केले आहे. ही प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. सदर अभियानांतर्गत पात्र होण्याकरीता ग्रामपंचायतींने मार्गदर्शक सुचनेनुसार पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत नामांकनाच्या दाव्यासाठी 06 निर्देशांकानुसार पात्र होणाऱ्या जिल्हयातील ग्रामपंचायतीची तालुका निहाय यादी तयार करण्यात आलेली असुन एकुण 777 ग्रामपंचायतपैकी 257 ग्रामपंचायतींनी टीबीमुक्त होण्यासाठी नामांकन दाखल केलेले आहेत. सदर नामांकनाची तपासणी करण्याकरीता जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात आली असुन सदर समिती दाव्याची पडताळणी करुन अहवाल देणार आहेत. यामध्ये पात्र होणाऱ्या ग्रामपंचायतींना मा. जिल्हाधिकारी “टीबीमुक्त पंचायत” म्हणुन घोषीत करणार आहेत व दिनांक 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमीत्त प्रमाणपत्र व छोटी महात्मा गांधींची मुर्ती देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे, तसेच जालना जिल्हयात 777 ग्रामपंचायती पैकी 257 ग्रामपंचायतीने “टीबीमुक्त ग्रामपंचायत” होण्यासाठी नामांकन दाखल केले आहे. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.