pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कानडे, सरचिटणीसपदी मा.आ विश्वनाथ डायगव्हाने तर कोषाध्यक्षपदी ए.बी.औताडे यांची एकमताने निवड!

शिक्षक विरोधी भूमिकेमुळे महामंडळाच्य● सभेत आमदार प्रशांत बंब यांचा जाहीर निषेध.● जुनी पेंन्शन, टप्पा अनुदानसह ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी तीव्र आंदोलनाचा निर्णय!

0 3 1 8 5 3

जालना/प्रतिनिधी, दि.1

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कानडे, सरचिटणीसपदी माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे तर कोषाध्यक्षपदी ए. बी. औताडे यांची एकमताने निवड करण्यात आली. महामंडळ कौन्सिल सभेभेने शिक्षक विरोधी भूमिका घेतल्या बद्दल आमदार प्रशांत बंब यांचा तीव्र निषेध केला.
या बाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ कार्यकारिणी कौन्सिल सदस्यांची सोमवार ३१ मार्चला जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक/शिक्षकेत्तर नोकरांची नागरी सह. पतपेढी जळगाव येथील सभागृहात दुपारी १२ वाजता सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार श्री. विश्वनाथ डायगव्हाणे सर होते.

नागपूर विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय सुधाकर आडबाले सर , पी.एस्.घाडगे, श्रावण बर्डे, अरविंद देशमुख, सुर्यकांत विश्वासराव, राजकुमार कदम,नानासाहेब पुंदे तसेच कार्यकारिणी सदस्य हजर होते. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यात जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान, संच मान्यता व त्यासंबंधीचे किचकट शासन आदेश, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना 10-20-30 लागू करणेबाबत, नवीन शैक्षणिक धोरण, सी.बी.एस्.सी. पॅटर्न , शिक्षक भरती, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांविषयी घेतलेल्या भूमिकेचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाची सन 2025 ते 2028 साठी नवीन कार्यकारणीची निवड या सभेत श्री. ज्ञानेश्वर कानडे सर यांची अध्यक्ष म्हणून तर सरचिटणीस म्हणून माजी आमदार व्ही.यू.डायगव्हाणे तर कोषाध्यक्ष म्हणून श्री. ए.बी.औताडे सर यांची एकमताने निवड करण्यातआली. शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांनी विधान परिषदेत मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर माहिती दिली. शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्या व समस्यांबाबत सर्व घटकांना एकत्र करून पुढील शैक्षणिक वर्षापासून व्यापक स्वरूपात आंदोलन उभं करण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला. “सर्वांना जुनीच पेन्शन योजना हवी” असे मत व्यक्त करुन NPS / RNPS/ UPS या पेन्शन योजनांवर सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. या सभेसाठी मराठवाडा माध्यमिक शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक फेडरेशनचे प्रतिनिधी तसेच डॉ.एन्.डी.नाद्रे, क्रीडा महासंघाचे शरदचंद्र धारुळकर, यु.यु.दादा पाटील ,आर्.एच्.बाविस्कर, जे.के.पाटील,साधना लोखंडे, पुष्पा पाटील, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. एस. डी. भिरुड सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 8 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे