महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी
जालना/प्रतिनिधी,दि. 7
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी जालना शहरातील उपकेंद्रांवर सकाळी 10.00 ते 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.
सदर परिक्षा जालना शहरातील मत्सोदरी शिक्षण संस्थचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय औरंगाबाद रोड, नागेवाडी, मत्सोदरी शिक्षण संस्था अंकुशराव टोपे कॉलेज, मोतीबाग, सीटीएमके गुजराती शाळा, सरोजनीदेवी रोड, आर.जी. बागडीया आर्टस, एस.बी. लहाटीया कॉमर्स अँड आर.बी. बेझांजी सायन्स कॉलेज, (जे.ई.एस. कॉलेज), दुर्गामाता रोड, श्री. सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ऊन हॉल जवळ, जुना जालना येथे होणार आहे.
जारी केलेल्या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार आदेश जारी केले आहेत. हा आदेश दि. 25 ऑगस्ट 2024 च्या सकाळी 8.30 वाजेपासून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत अंमलात राहणार आहेत.