काजळा येथे पोळा मोठ्या उत्साहात साजरा

काजळा/प्रतिनिधी, दि.2
आज (दि 2) रोज सोमवार या दिवशी बदनापूर तालुक्यातील काजळा या गावात ‘पोळा’ हा बैलांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बदनापुर तालुक्यातील काजळा येथे दरवर्षी पोळा हा बैलांचा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात तो याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करण्यात आला आहे
पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ हा सण काजळा येथे ठिकठिकाणी साजरा झाला.