श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे वृक्षारोपण.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्याचा विविध उपक्रम व कार्यक्रमातून प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे रविवार दि ७/७/२०२४ रोजी उरण तालुक्यातील कडापे येथे डोंगर पायथ्याशी मुख्य रस्त्याच्या बाजूला भारतीय देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
वड,पिंपळ, कडुलिंब आदी विविध भारतीय देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाची होणारी ऱ्हास लक्षात घेऊन निसर्गाचे संवर्धन, संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून सदर उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सल्लागार सुधीर मुंबईकर, अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे ,खजिनदार सुरज पवार, सचिव प्रेम म्हात्रे,सल्लागार कुमार ठाकूर, संपर्कप्रमुख ओमकार म्हात्रे,सदस्य आकाश पवार,माधव म्हात्रे,नितेश पवार, प्रणित पाटील,सागर घरत,हितेश मोरे,सानिका पाटील आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.