आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत जालन्याची मनस्वी दांडगे सर्वप्रथम..
आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मनस्वी दांडगे या विद्यार्थिनीचे यश

जालना/प्रतिनिधी,दि.7
पुणे येथे नुकत्याच झालेल्या
तेराव्या नॅशनल आणि सहाव्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यामधील स्मार्ट किड च्या शाखेतील 3500 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामधून जालन्याची मनस्वी दांडगे या विद्यार्थिनीने B2 कॅटेगिरीतून प्रथम क्रमांक पटकवला आहे यानिमित्त तिचा स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमीच्या मुख्य संचालिका सौ. प्राजक्ता संजय कळमकर मॅडम यांनी तिचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव केला . तसेच या स्पर्धेमध्ये आर्यन शेळके , सानिध्य कांबळे ,त्रिशा सोनार, विराज दांडगे, नैतिक गडवे ,अथर्व गिरी ,सार्थक गिरी, तसेच तृप्ती गिरी व श्रुती गिरी यांनी देखील पुणे येथे अबॅकस स्पर्धेत सहभाग घेऊन विशेष ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळवले आहे या सर्वाना जालना स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमीच्या संचालिका सौ जयश्री बुट्टे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.