जिल्ह्यात तीन शासकीय निवासी शाळेतील इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल
तीन वर्षापासून 100 टक्के निकालाची पंरपरा कायम
जालना/प्रतिनिधी,दि.28
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जालना जिल्ह्यात जालना, बदनापूर व भोकरदन येथे अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा सुरु आहेत. या निवासी शाळेत प्रत्येकी 200 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात या तिन्ही शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जालना येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील प्रज्ञा सोनकांबळे 85.60 टक्के, मिरा बोर्डे 81.20 टक्के, अरुणा खरात 78.60 टक्के, बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील आर्यन गायकवाड 88.80 टक्के, आदित्य कांबळे 87.80 टक्के, यशराज शिंदे 84 टक्के, भोकरदन येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील जीवन सुरडकर 93.20 टक्के, धम्मपाल सुरडकर 91.40 टक्के, पवन मोरे 89.40 टक्के या अनुक्रमे प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. मागील तीन वर्षापासून या तिन्ही शाळांनी 100 टक्के निकालाची पंरपरा कायम राखली आहे. या शाळेतील यशस्वी निकालाबद्दल प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांच्यासह मुख्याध्यापक श्रीमती सुर्यकला गोसावी, डॉ. दिलीप गिरी व रघुनाथ खेडेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक करत अभिनंदन केले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.