जासई विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
रयत शिक्षण शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग, जासई, ता. उरण ,जि. रायगड. या विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणतज्ञ,पद्मभूषण, डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती सोहळा सभा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर हे लाभले होते. त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाचे प्राचार्य तथा रायगड विभागाचे विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे यांनी शाखेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्तावित केले, प्रस्ताविका मधून त्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रायगड विभागाचे विभागीय चेअरमन बाळाराम पाटील हे होते. त्यांच्या शुभहस्ते कर्मवीरांच्या पुतळ्याचे पूजन केले गेले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे चे प्राचार्य डॉ.प्रल्हाद पवार हे होते.त्यांनी आपल्या मनोगता मधून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागमय जीवनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. रयत चे जनरल बॉडी सदस्य सुधीर घरत, विद्यालयाचे व्हा.चेअरमन डी.आर.ठाकूर यांनीही कर्मवीरांचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या कर्मवीर जयंती निमित्ताने विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि विद्यालयातील एस.एस.सी,.एच. एस.सी.तील प्रथम क्रमांकाचे मानकरी,तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि गुणवंत सेवक यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले गेले.
अध्यक्षीय मनोगतात रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थे विषयी कृतज्ञता व्यक्त केले.आणि या विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगती बद्दल समाधान व्यक्त करून यापुढेही या विद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले. गतवर्षी ज्युनिअर कॉलेजच्या इमारत बांधकामासाठी रामशेठ ठाकूर यांनी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच यापूर्वीही त्यांनी भरीव मदत दिलेली आहे. त्यांच्या या देणगी बद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करून विद्यालयाचे प्राचार्य यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी साहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप ,रयत सेवक बँकेचे संचालक किशोर पाटील, विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग,रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे, व्हाईस चेअरमन डी.आर. ठाकूर , नरेश घरत,अविनाश पाटील, प्रभाकर मुंबईकर, यशवंत घरत, महादेव म्हात्रे,जी.सी.घरत, धर्मदास घरत,अमृत ठाकूर, मधुकर म्हात्रे ,सुभाष घरत,हिरालाल ठाकूर,रमेश पाटील ,गोपीनाथ ठाकूर,शंकर घरत, गोपीनाथ म्हात्रे ,शकुंतला घरत,घरत टी.टी,रजनीताई घरत,जयश्रीताई घरत,इत्यादी मान्यवर तसेच शिक्षण प्रेमी नागरिक ,ग्रामस्थ सर्व सेवक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अतुल पाटील, घरत पी.जे. यांनी केले.तर आभार प्रदर्शन रयत गुरुकुल प्रमुख ठाकरे एस. पी .यांनी केले.