मांजरम येथे जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न …!

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.22
नायगाव तालुक्यातील मांजरम येथे वन विभाग नांदेड वनपरिक्षेत्र कार्यालय देगलूर यांच्या वतीने , नांदेड जिल्ह्याचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक श्री. भीमशिंग ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर श्री. निखिल हिवरे यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक वनदिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल मांजरम च्या पटांगणा मध्ये सरपंच प्रतिनिधी व उपसरपंच व गावकरी , विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच मांजरम येथील वनरक्षक श्री गजानन कोतलवार व कर्मचारी यांनी जागतिक वन दिनानिमित्त 21 मार्च या दिवशी सकाळी वृक्षारोपण करून साजरा केले आहे. हाजार हाताने देणाऱ्या वनाची पुण्याई वन आहे .सर्व नद्यांची आई. वनरक्षक कोतलवार मुलांना झाडांचे महत्त्व सांगून प्रत्येक नागरिकांनी आणि मुलांनी दरवर्षी एक झाड लावले पाहिजे व त्याची जोपासना केली पाहिजे. मुलांना मार्गदर्शन केले .यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधी शिंदे आशिष उपसरपंच बालाजी मालीपाटिल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वन विभागाचे इतर कर्मचारी गिरी, रागलवाड, रीजतवाड, गंगलवाड आणि शाळेतील शिक्षक पाटील सर .बैस सर. मानसिंगे सर व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मुलं मुली उपस्थित होते.