धनगर समाजाच्या विद्यार्थिनीची अभिमानास्पद कामगिरी!

जालना/प्रतिनिधी, दि.12
कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो..!
आमच्या कॉलनीतील आदर्श शिक्षिका विजू ताई भोंडवे यांची सुपुत्री अनुजा हरिदास भोंडवे हीचा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचे स्वप्न असणाऱ्या MBBS साठी शासकीय कोट्यातून पात्र ठरली आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिचा एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित झाला आहे.
विशेष सांगावेसे वाटते की, वडिलांच्या दुःखद निधनामुळे भोंडवे परिवारावर दुःखाचा डोंगर असतानाही वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने,कठोर मेहनतीने,रात्रंदिवस अभ्यास करून अनुजाने आकाशाला गवसणी घातली आहे.
आवर्जून सांगावेसे वाटते की, अनुजाची बालपणीची जिवलग मैत्रीण वेदिका चव्हाण हि देखील मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी पात्र ठरली आहे. शालेय शिक्षण, नवोदय शिक्षण या दोघींनी सोबतच पूर्ण केले आणि आता एमबीबीएसला देखील दोघींनी सोबतच गवसणी घातली आहे!
त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरी बद्दल कौतुकाची थाप देण्यासाठी कर्तबगार मा.नगरसेवक श्री.सौरभ मालक कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते तथा जिवलगस्नेही मित्र श्री. सुनील भाऊ बिडे, आदर्श शिक्षक तथा कविवर्य रमेश मांयदे सर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत श्री. संदीप खोरे यांच्या समवेत उपस्थित राहून अनुजा व वेदिकाचा गुणगौरव केला!
अंबड शहरवाशी म्हणून त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान वाटतो, विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे!
अनुजा व वेदिका यांनी आयुष्यात अशीच उत्तुंग भरारी घेत यश संपादन करत राहो, कीर्तीमानाचे नवनवे विक्रम स्थापित करून यशाचा झेंडा त्रिलोकी फडकत राहो.!हीच ईश्वरचरणी प्रार्थना