अभिनेते एम.नटराज झोलर शॉर्ट फिल्म मध्ये दिसणार विशेष भुमीकेत सोबत हास्यसम्राट आशिष सातपुते यांचा कॉमेडी चा तडका
सोबत हास्यसम्राट आशिष सातपुते यांचा कॉमेडी चा तडका

जालना/प्रतिनिधी, दि.16
निर्माता दिग्दर्शक विकी हरनामे यांची सामाजिक विषयावरील झोलर नावाची शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आजच्या यावा पिढीने आवर्जून पाहावी असा विषय मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न कथा लेखक शुभम काडलाक आणि दिग्दर्शक विकी हरनामे यांनी केला आहे,विशेष म्हणजे अभिनेते एम.नटराज एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत तसेच होम मिनिस्टर कार्यक्रम सादर करणारे तसेच लावरे तो व्हिडिओ फेम अभिनेते आशिष सातपुते सुद्धा एका विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार आहेत या वेबसीरिज मध्ये ॲक्शन,कॉमेडी,सस्पेन्स, इमोशन ठासून भरलेली आहे यात निर्माता दिग्दर्शक विकी हरनामे आहेत तर छायाचित्रण मंदार शिर्के यांचे आहे कथा शुभम कडलाक यांची असून संवाद शुभम कडलाक आणि विकी हरनामे यांचे आहे यातील मुख्य कलाकार आहेत हितेश मुदलियार,वेदिका हळीमनि,आदिती पवार,खुशी यादव,हेमंत गांगुर्डे,श्रावणी भानगे,संकेत बनसोडे ज्योतिका मदूराई,स्वप्नील टोपे,अनिल उपाध्याय,कल्पना ढगे या आहेत तर हास्यसम्राट आशिष सातपुते तर विशेष भूमिकेत दिसणार एम.नटराज.
प्रोडक्शन मॅनेमेंटमध्ये प्रमोद कांबळे, आकाश गवारे हे आहेत तर स्पॉट बॉय संचित,चेतन आहे
वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस.