उलवेमध्ये महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान
स्व.यमुनाबाई घरत यांचा मंगळवारी अकरावा स्मृतिदिन मंत्री गणेश नाईक, मंत्री आदिती तटकरे, सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मातोश्री दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांचा अकरावा स्मृतिदिन मंगळवारी (दि. ११ मार्च) आहे. यावेळी कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ‘यमुना स्त्री सन्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम शेलघर येथील महेंद्र घरत यांच्या ‘सुखकर्ता’ बंगल्याच्या गार्डनवर होईल. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा सकाळी ११ वाजता कार्यक्रम पार पडणार आहे. याप्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मनोरंजनार्थ ‘देवकी मीडिया- साहिल रेळेकर’ प्रस्तुत ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मराठी भावगीत व भक्तीगीतांच्या बहारदार संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील ख्यातनाम गायक, वादक व निवेदक सहभागी होणार आहेत. ‘यमुना सामाजिक व शैक्षणिक संस्था’, शेलघरच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या सचिव शुभांगी महेंद्र घरत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी वैभव पाटील (९८१९३२५५५४) यांच्याशी संपर्क साधावा.