
जालना/प्रतिनिधी,दि.29
श्री गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नजिक पांगरी या संस्थेच्या जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय, शेलगाव या कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्रात (क्रमांक 23103) बी.ए. (G01) आणि एम.ए. (इंग्लिश) (M72) या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक 31 जुलै, 2023 आहे. या शिक्षणक्रमास www.ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरतांना काही अडचणी आल्यास जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय शेलगाव या अभ्यासकेंद्रावर प्रत्यक्ष भेटून फॉर्म भरून घेता येईल.
सदरील प्रवेश प्रक्रिया ही झेरॉक्स सत्यप्रतिवर केली जाते, ज्या विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेता येत नाही, जे विद्यार्थी व गृहिणी शिक्षणापासून वंचित उपेक्षित दुर्लक्षित आहेत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य ज्ञानगंगा घरोघरी च्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक करत आहे. या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून उच्चविद्या घोषित पदवी प्राप्त करून घेता येते. तसेच मे जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या विद्यापीठाच्या बी.ए. आणि एम.ए. इंग्लिश या परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय शेलगाव या अभ्यासकेंद्रावर वरील शिक्षणक्रमांना अद्याप प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2023 पूर्वी आपला प्रवेश तीन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष अभ्यास केंद्रावर भेटून करावा, आवाहन विद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यासकेंद्राचे केंद्रप्रमुख के.जी. वाळके (मो. 9422722270) यांनी केले आहे. माहितीसाठी व प्रवेशाकरीता अभ्यासकेंद्राचे समन्वयक श्री हेमराज आहेर (मो. 7058362270) यांच्याशी संपर्क साधावा.