विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.31
अर्भक व बाल मृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असुन 5 ते 7 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि या बालमृत्युचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे मृत्यू शुन्य करणे हे उद्दिष्ट ठेवून जिल्ह्यात दि.6 ते 21 जुन 2024 या कालावधीत “विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा” राबविण्यात येत आहे. याकरिता जिल्ह्यातील 2.5 लक्ष बालकांचा सर्व्हे करुन त्यांना आरोग्य कर्मचारी, आशामार्फत ओ.आर.एस. (जलसंजीवनी) व टॅब. झिंक वाटप करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नये, उकळुन व शुध्द पाणी प्यावे तसेच अतिसाराची लक्षणे दिसता क्षणी रुग्णालयात जावून उपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.