जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.26
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 27 व दि. 28 डिसेंबर 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला असून दि. 26 डिसेंबर 2024 रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच दि. 27 डिसेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 50 ते 60 कि.मी. प्र.ता. वेगाने) गारपीट होण्याची तसेच दि. 28 डिसेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 30 ते 40 कि.मी. प्र. ता.वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तर दि. 29 डिसेंबर 2024 रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.