pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

एक कणखर नेतृत्व संतोष अण्णा डोंगरखोस

0 1 7 7 6 4

सिंधिकाळेगाव/शामभाऊ गिराम,दि.19

जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील सावता महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष(आण्णा) डोंगरखोस एक प्रचंड इच्छाशक्ती व दुर्दम्य साहस असलेला निर्भीड युवा नेता..
कारला या खेडेगावात 20/08/1985 रोजी त्यांचा जन्म झाला संतोष अण्णा डोंगरखोस लहानपणीच हुशार असल्याने शिक्षकाचे आवडते होते,पुढे सर्व काही व्यवस्थित सुरू होते परंतु अचानक नियतीने घात केला दिनांक 1/03/1996 रोजी वडील कै.होणाजी दगडुबा डोंगरखोस यांचे देहावसन झाले,वडीलांच्या मृत्यूनंतर आई सत्यभामाबाई डोंगरखोस व बहीण संगिताताई डोंगरखोस भाऊ गणेश होणाजी डोंगरखोस यांच्यासह ते ई.स.1997 ला सिंधी काळेगाव येथे वास्तव्यास आले,वडीलाचे छत्र हरवले परिस्थिती हलाकीची घरात कमवता व्यक्ती नाही मोठ्या भावानी घर चालवण्यासाठी अर्ध्यातच शिक्षण सोडले आई व भाऊ मोलमजुरी करून शिकवत होती म्हणजे पैसा जेमतेम होता म्हणुन नाईलाजाने कला शाखेत इयत्ता11वी शंभु महादेव कनिष्ठ महाविद्यालय वाटुर येथे मामाच्या गावी शिक्षण सुरू केले,प्रचंड ईच्छाशक्ति व घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने आदरणीय संतोष आण्णा यांनी खुप मेहनत घेतली समाज कार्याला खरी गती जालना येथे आल्यामुळे मिळाली अण्णांचे पुढे 2015 मधे सिंधी काळेगाव ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूकीत अण्णांनी त्यांची पत्नी सौ.गंगाताई संतोष डोंगरखोस यांना उमेदवारी घेवुन लढवली यामधे अत्यल्प मताने पराभव झाला पण खचून न जाता पुढे सामाजिक कार्य चालु ठेवण्याचा चंग अण्णांनी मनात बांधला.
पुढे जालना शहरात महात्मा फुले विचार मंच,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,महाराष्ट्र माळी समाज महासंघ जालना जिल्हाध्यक्ष म्हणुन अण्णांनी आपल कार्याला सुरूवात केली,अशातच शिवसेनेची अंगिकृत संघटना शिक्षक सेनेमधे काम करत असल्यामुळे शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनभाऊ खोतकर यांच्याशी संपर्क झाला व अल्पावधीतच अर्जुनभाऊ यांच्याशी व शिवसेना जिल्हाप्रमुख आदरणीय भास्करावजी अंबेकर साहेब यांच्याशी परिचय झाला.जालना शहरातील त्यांच विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यातील योगदान व त्याला मिळत असलेल्या सर्व मित्रमंडळी ची साथ यामुळे संतोष (आण्णा)डोंगरखोस हे जालना शहरातील दिग्गज शिवसेना नेते अर्जुनभाऊ खोतकर यांचे विश्वासू कार्यकर्ते झाले.त्यांच्या उत्तम कार्यपद्धतीमुळे विविध समाज घटकातील लोकांना न्याय देण्याच प्रामाणिक कार्य ते सतत करत असतात. संतोष अण्णा डोंगरखोस यांनी ६ सप्टेंबर २०२० रोजी सावता महासंघ संघटना स्थापना केली आता ही संघटना जालना,संभाजीनगर,बीड,बुलढाणा,
नाशिक,धुळे,हिंगोली येथे महाराष्ट्र भर शाखा संघटित आहे व सावता महासंघाचे काम पुर्ण महाराष्ट्रात पसरवणार आहे असे संतोष अण्णा डोंगरखोस यांनी सांगितले
अहोरात्र मेहनत करुन एक राज्यव्यापी सामाजिक संघटन तयार केली व ते यशस्वीपणे चालवतो ही गोष्ट नक्कीच महाराष्ट्रातील माझ्यासारख्या असंख्य तरुणांना प्रेरणा देवुन जाते.हा लेख आदरणीय संतोष अण्णा डोंगरखोस यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे