pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पन्नासवा अखंड हरिनाम सप्ताह कुंचेली ता.नायगाव येथे 8 फ्रेबु.ते 15 फ्रेबु.24 पर्यंत धार्मिक सप्ताह ऊत्साहात संपन्न

0 1 7 7 8 1

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.15

हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त कुंचेली ता. नायगाव येथे (दि. 8 फ्रेबु.२०२४ ते 15फ्रेबु.2024पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला अनेक कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात संपन्न झाला आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते सहा वाजता काकडी आरती भजन, सकाळी 7ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11ते 12 वाजता गाथा भजन, सायंकाळी पाच वाजता प्रवचन,सांय. 6ते 7हरिपाठ, रात्री आठ ते दहा वाजता हरिकीर्तन आणि रात्री अकरा वाजता हरिजागर व भजन असे दैनंदिन कार्यक्रम झालेत
सप्ताहात दि. 8फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प.विष्णुदास महाराज तांदळिकर, दि. 9 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प.त्रंबक महाराज नंदगावकर
दि. 10 फ्रेबु रोजी श्री ह.भ.प. योगेश महाराज वसमंतकर
दि. 11 फ्रेबु रोजी श्री ह.भ.प. राम महाराज पांगरगेकरदि.12 फ्रेबु रोजी श्री ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर दि. 13 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प.विकास महाराज दसवाडीकरदि.14 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प.किसन महाराजबरबडेकर
दि.15 फ्रेबु. रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान श्री ह.भ.प. किसन महाराज बरबडेकर यांचे काल्याचे कीर्तनाने काला वाटुन महाप्रसादाने सांगता झाली.
गायनाचार्य हभप बापुराव पाटिल टाकळिकर, हभप गंगाजी महाराज खतगाव हभप भागवत पाटिल तांदळिकर,साईनाथ पा.खैरगावकर,रमेश पा.खैरगाव,
मृदंगाचार्य हभप विश्वेश्वर महाराज कोंलबि,तुकाराम जाधव मोकासदरा, दि.11 फ्रेबु. 2024 रोजी आम्हि वारकरी परिवार सेवाभावी संस्था शाखा बोर्ड अनावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर ईतर प्रमुख पाहुणे घ्या हस्ते अनावरण बोर्डाचे अनावरण पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा सांय. 5 वाजता संपन्न झाला.
दि. 14 फ्रेबु.रोजी सांय 4 ते 6 वाजता माऊलीची पालखीची गावात मिरवणूकित अनेक महिला भाविकांनी सहभागी घेऊन नामघोषेत सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला .
असे प्रसिध्दीपत्रक श्री हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुंचेली ता.
नायगावच्या वतीने दिले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे