आव्हाना जि.प.सर्कल खा . कल्याण काळे चां आभार दौरा

भोकरदन/प्रतिनिधी, दि.6
सुरंगली येथील काशी विश्वेश्वर मंदीरास सद्इच्छा भेट . काशी विश्वेश्वर तिर्थक्षेत्राला तिर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्याची गावकऱ्यांची मागणी । पिंपळगाव रेणुकादेवी गणेशराव खिस्ते .।। भोकरदन तालुक्यातील आव्हाना जि.प.सर्कल मधील खालील गावांना खा. काळे यांनी भेटी देत आभार दौरा केला. मालखेडा,ठालेवाडी,आव्हाना,सुभानपुर,भिवपुर,गोकुळ,वाडी .बु.,वाडी खुर्द,वाकडी, कुकडी, कठोराबाजार, सुरंगली, निवडणुकीत नंतर आभार मानण्यासाठी परवा शुक्रवारी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ कल्याण काळे यांनी भेटी दिल्या.व मतदाराचे आभार मानले .सुरंगली येथे काशी विश्वेश्वर मंदीरास सद्इच्छा भेट देऊन शंभु महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. काशी विश्वेश्वर तिर्थक्षेत्राला तिर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्याची मागणी गावकरी आणि मंदीर समितीच्या वतीने करण्यात आली. सुरंगली ग्रा.प.चे सरपंच अशुंकुमारी रामेश्वर दांडगे, विनोद जाधव यांनी खा.काळे यांचा सत्कारो केला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेस जालना जिल्हाध्यक्ष राज्याभाऊ देशमुख , काँग्रेस भोकरदन तालुका अध्यक्ष त्रिंबक पाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष रमेश सपकाळ, प्रा.अंकुशराव जाधव, रामदास रोडे , आपचे बोरसे गुरुजी, शिवसेना उबाठाचे जालना जिल्हा उपप्रमुख मनीष भैय्या श्रीवास्तव, भोकरदन तालुका प्रमुख नवनाथ दौंड, विश्वासराव वाघ . यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विनोद जाधव ग्रा.प.सदस्य यांनी गावांच्या विकासासाठी आवश्यक विविध मागण्यांचे निवेदन डॉ कल्याण राव काळे यांना दिले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी सरपंच काशीनाथ राव दांडगे, धनराज काळे, प्रमोद जाधव , नारायण कडुबा काळे, भाऊसाहेब काळे, संतोष काळे,शेख रुबाब शेख गुलाब, अँड एफ.एच.सिरसाट यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज काळे यांनी केले तर सुत्र संचालन अँड.एफ.एच.सिरसाठ यांनी केले.