महिलांनी मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा लाभ घ्यावा सिडीपीओ उमेश मुदखेडे
पळसा येथे महसूल दिनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण शिबीर संपन्न

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.1
महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतुन जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत राऊत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक मिनल करनवाल महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम यांच्या आदेशानुसार महसूल दिनानिमित्त हदगांव तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाचे बालविकास विकास अधिकारी उमेश मुदखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार एक आगष्ट रोजी पळसा ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात शुक्रवार एक आगष्ट रोजी लोकशाहीत अण्णा भाऊ साठे यांची जंयती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करून महसूल दिनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण शिबीर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित महिलांना सिडीपीओ उमेश मुदखेडे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने विषयी सखोल मार्गदर्शन केले. महिलाच्या अडी अडचणीचे निरासण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच आशाताई धाडेराव उपसरपंच संजय भाऊ काला होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसिलदार तामसकर होते.यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे मंडळ अधिकारी गोडबोले मॅडम पर्यवेक्षिका वानखेडे मॅडम तलाठी प्रदिप कुलकर्णी ग्रामसेवक एम.एम. सोनटक्के, आरोग्य सहाय्यक संतोष स्वामी , शंकरराव कदम,माजी सरपंच रणजित कांबळे , कुबेरराव राठोड किन्हाळकर , सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे , ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, गावातील प्रतिष्ठित नागरिक , पत्रकार बांधव अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन आभार गजानन मस्के पळसेकर यांनी केले.