शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत हदगांव ते कपीलधारा पदयात्रेचे आयोजन

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.29
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेदान्ताचार्य शिवाचार्यरत्न सदगुरु सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पलसिद्ध धर्मपीठ श्रीक्षेत्र साखरखेर्डा यांच्या प्रेरणेतून हदगांव शहरांतील महादेव मठाचे मठाधिपती श्री ष ब्र 108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली हदगांव आखाडा बाळापुर ते श्री संत शिरोमणी ममन्थ स्वामी श्रीक्षेत्र कपिलधार येथे निसर्ग रम्य पवित्र पुण्यपावन तीर्थक्षेत्रात भव्य दिव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पदयात्रेत दररोज दैनंदिन पुजा आरती किर्तन प्रवचन अन्नदात्याकडुन अन्नदानासह भक्तगणाकडुन गरजेनुसार अनेक गावाकडुन विशेष सहकार्य देणार आहेत. मानवी जिवन सत्पथ गामी होवुन संस्कृत व सदाचार संपन्न व्हावे.करीता सत्समागमाची आवश्यकतेसाठी मार्गदर्शनाची गरज असल्याने पदयात्रेच्या माध्यमातून संधी मिळणार असल्याने सोमवार चार नोव्हेबर रोजी हदगांव शहरांतील महादेव मठातुन मिरवणुकीने पदयात्रेला सुरुवात होणार असून भक्तगणांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.