pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वीज पडुन मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसास व पशुधन मालकास दोन दिवसात मदत वितरीत करावी – निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ

0 1 7 7 5 8

जालना/प्रतिनिधी,दि.3

जालना जिल्ह्यामध्ये माहे एप्रिल 2024 मधील अवेळी पाऊस, गारपीट व वादळी वारा यामुळे 1 व्यक्ती मयत झालेला असुन 5 व्यक्ती जखमी झालेले आहे. तसेच जनावरामध्ये जिवीत हानी लहान व मोठे दुधाळ 67 जनावरे गाय,म्हैस,बकरी व लहान व मोठे ओढकाम करणारे 23 जनावरे बैल,गोऱ्हे असे एकुण 90 जनावरे मयत झालेले आहे. तरी वीज पडून मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना व मृत जनावराच्या मालकास पुढील दोन दिवसामध्ये मदत वितरीत करण्याच्या सुचना जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना  निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिल्या आहेत.

दि. 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानूसार मयत व्यक्तीच्या वारसास 4 लाख रुपये,  दुधाळ गाय व म्हैस या जनावरासाठी प्रत्येकी 37 हजार 500 रुपये, बकरी यासाठी प्रत्येकी 4 हजार रुपये तसेच ओढकाम करणारे बैल यासाठी प्रत्येकी 32 हजार रुपये याप्रमाणे रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकांनूसार  देण्यात येणार आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमीना मदत देण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुहानी झालेल्या मृत जनावराच्या मालकास पशुधन खरेदीसाठी शासनाकडुन उणे (-) प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. असेही कळविले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे