ब्रेकिंग
जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बुधवारी बैठक
0
3
1
8
3
9
जालना/प्रतिनिधी,दि.13
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक बुधवार दि.19 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठकीत ज्या अर्जदारांना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याविरुध्द भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अफरातफर आणि विलंब केल्याबाबत तक्रार द्यावयाची असेल त्यांनी संबंधित तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे सबळ पुरावे सादर करुन तक्रार द्यावी, असे जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
1
8
3
9