विधानसभा सार्वत्रिक निवडणुकच्या मतमोजणीसाठी वाहतुक मार्गात बदल

जालना/प्रतिनिधी,दि.21
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही जालना ते भोकरदन या महामार्गालगत असलेले नगर परिषद मंगल कार्यालय भोकरदन येथे होणार असुन, मतमोजणीकरीता विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असल्याने अवजड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन विवादीत परिस्थिती निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने व वाहतुकीच्या सुनियमनासाठी भोकरदन ते जालना या मुख्य महामार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये, पोलीस अधीक्षक, अजय कुमार बसंल यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालनाकडुन भोकरदन मार्गे सिल्लोड, जळगाव, जाफ्राबाद, बुलढाणाकडे जाणारी वाहने तसेच भोकरदन मार्गे जालनाकडे येणारी अवजड वाहनांना दिनांक 23 नोव्हेंबर, 2024 रोजी 07:00 वा.ते 23:00 वाजेपर्यंत खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
जालनाकडून भोकरदन मार्गे जळगावकडे जाणारी अवजड वाहने ही छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजूर, फुलंब्री मार्गे जळगावकडे जातील तसेच जळगावकडून भोकरदन मार्गे जालनाकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील. जालनाकडून भोकरदन मार्गे बुलढाणा जाणारी अवजड वाहने ही छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजूर, टेंभुर्णी, जाफ्राबाद मार्गे बुलढाणाकडे जातील तसेच बुलढाणाकडून भोकरदन मार्गे जालनाकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
सिल्लोडकडून भोकरदन मार्गे जाफ्राबाद, बुलढाणा जाणारी वाहने ही मालखेडा, आव्हाना, आसडी, वाकडी, मलकापूर, आन्वा पाटी मार्गे जाफ्राबाद, बुलडाणा कडे जातील तसेच बुलडाणा, जाफ्राबाद कडून भोकरदन मार्गे सिल्लोड कडे जाणारी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
सिल्लोडकडून भोकरदन मार्गे जालनाकडे जाणारी हलके चारचाकी वाहने ही राजस्थान हॉटेल (नांजा पाटी) भोकरदन, नांजा पाटी, नांजावाडी, नांजा, नांजा पाटी (जालना रोड) मार्गे जालनाकडे जातील तसेच जालनाकडून भोकरदन मार्गे सिल्लोडकडे जाणारी हलके चारचाकी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
जाफ्राबादकडून भोकरदन मार्गे सिल्लोड, जळगावकडे जाणारी वाहने ही आन्वा पाटी, वाकडी, आन्वा, शिवना, अजिंठा मार्गे सिल्लोड जळगावकडे जातील तसेच जळगांव, सिल्लोडकडून भोकरदन मार्गे जाफ्राबादकडे जाणारी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
जाफ्राबाद, बुलढाणाकडुन भोकरदन मार्गे जालनाकडे जाणारी वाहने ही सिपोरा बाजार, दावतपुर, टाकळी, बरंजळा साबळे, नळणी, राजुर मार्गे जालनाकडे जातील. तसेच जालनाकडून भोकरदन मार्गे जाफ्राबाद, बुलढाणाकडे जाणारी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
जालनाकडून भोकरदन शहारात जाणारी अवजड व हलके चारचाकी वाहने ही उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भोकरदन, क्रिडा संकुल मार्गे भोकरदन शहरात जातील तसेच भोकरदन शहरातून जालनाकडे जाणारी अवजड व हलके चारचाकी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
वरिल मार्गाचे अवजड व हलके चारचाकी वाहतुकी मध्ये दिनांक 23 नोव्हेंबर, 2024 रोजी 7:00 वा.ते 23:00 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहे.