औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 19 डिसेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.16
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना यांच्यावतीने दि. 19 डिसेंबर 2024 रोजी 10.00 वाजता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरती मेळाव्यासाठी औरंगाबाद येथील नामांकित कंपनी बजाज ऑटो सहभाग घेणार आहे.
आयटीआयच्या शेवटच्या वर्षाला प्रवेशित असलेले मोटार मेकॅनिक, पेंटर (जनरल), टर्नर, मशिनिष्ठ, फिटर वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशन, डिझेल मेकॅनिक, कोपा या व्यवसायातील उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. (आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या भरती मेळाव्यासाठी सहभाग नोंदवू नये). असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था पी.डी. उखळीकर व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर.एस. शेळके यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी क. प्रशिक्षणार्थी सल्लागार ए.एस. धाबे व वरिष्ठ लिपिक एस.जी. चव्हाण यांच्याशी 9922531766, 9763607850 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.