pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने ३० ऑक्टोबर रोजी संचालनालय बेलापूर कार्यालयासमोर आमरण उपोषण.

0 3 1 8 2 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचा-यांच्या दिर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली दि. २०/०३/२०२३ रोजी विधान भवन, मुंबई येथे घेतलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी राज्यातील नगरपरीषद, नगरपंचायतीमधील कामगारांच्या प्रलंबीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले होते. या बैठकीमध्ये राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त सचिव मनोज सौनीक, सामाजिक न्याय विभाग सचिव सुमंत भांगे, नगरविकास विभाग प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, महाराष्ट्र नगरपरीषद, नगरपंचायत आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी हे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. यांच्या समक्ष राज्यातील नगरपरीषद, नगरपंचायतीमधील कामगारांच्या प्रलंबीत मागण्यांवर चर्चा होऊन निर्णय झाले आहेत. या निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरिता गेले ७ महिने सातत्याने पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा करूनही सदर प्रश्न या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मार्गदर्शक सुचना आदेश देऊनही तसेच या संदर्भातले इतिवृत्त लेखी स्वरूपात असतानाही या विषयांची गेले ७ महिने अंमलबजावणी न झाल्यामुळे या व इतर काही महत्त्वाचे प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणूकीकरीता तसेच मा. महाराष्ट्र शासनाचे आणि मा. संचालक कार्यालयाचे लक्ष वेधण्यासाठी संविधानातील तरतुदींनुसार सनदशिर मार्गाने स्वत:लाच आत्मक्लेश करून घेण्याकरीता दि. ३०/१०/२०२३ रोजी मा. आयुक्त तथा संचालक, संचालनालय सी.बी.डी. बेलापूर या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, संघर्ष समितीच्या वतीने ‘आमरण उपोषण करण्यात येणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक संतोष पवार यांनी दिली.यालढ्यात संघर्ष समितीमध्ये असलेल्या चारही संघटना सर्वार्थाने सहभागी होत आहेत. चार संघटनांचे नेते डॉ डि एल कराड,CITU महाराष्ट्र राज्य नगरपरीषदा नगरपंचायती कामगार कर्मचारी समन्वय समिती, ॲड सुरेश ठाकूर-म्युनिसिपल एम्प्लाईज युनियन, डि पी शिंदे- महाराष्ट्र राज्य नगरपरीषदा नगरपंचायती कर्मचारी संवर्ग कर्मचारी महिती, रामगोपाल मिश्रा- भारतीय मजदूर संघ, ॲड सुनील वाळूंजकर- महाराष्ट्र राज्य, मुख्य संघटक, यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि पूर्ण सहभाग असणार आहे.

––————————————————–

मा. संचालक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी काही विषयात सातत्याने नकारात्मक भूमिका / चर्चा केल्यामुळे राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. या संपूर्ण परिस्थितीला विचारात घेवून सोमवार, दि. ३०/१०/२०२३ रोजी मा. आयुक्त तथा संचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे. तसेच प्रश्न न सुटल्यास राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती कोणत्याही दिवशी बेमुदत संपावर जातील. यामुळे या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगरविकास विभाग आणि संचालक कार्यालय यास पुर्णपणे जबाबदार असणार आहे.
-संतोष पवार,महाराष्ट्र राज्य, मुख्य संघटक.महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 8 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे