आगामी लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक पक्षाचे जेष्ठ नेते प्रभाकर पवार यांनी शुक्रवार रोजी प्रितीसुधानगर येथील आ. कैलास गोरंट्याल यांच्या कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत जालना विधानसभा मतदार संघातील बुथ कमिट्या आणि बीएलएच्या नियुक्ती संदर्भात आढावा घेण्यात आला. विधानसभा मतदार संघातील बुथ कमिट्या आणि बीएलए गठीत करण्यात आलेल्या आहेत.
जालना महानगर पालीका हद्दीतील जालना ग्रामिण भागातील बुथ कमिट्या आणि बीएलएची यादी यापुर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव यांनी सुपुर्द केली आहे. बैठकीच्या प्रारंभी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल आणि नवनियुक्त निरीक्षक प्रभाकर पवार यांचा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना पक्षनिरीक्षक श्री पवार म्हणाले की, आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबुत सक्रीयपणे काम करीत असल्यामुळे मतदार संघातील बुथ कमिट्या आणि बीएलएच्या नेमणुका पुर्ण झालेल्या आहेत. हा सर्व अहवाल लवकरच प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बैठकीचे प्रास्ताविक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. या बैठकीस जालना तालुका अध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, रमेश गोरक्षक, सतीश सोडाणी, बाबासाहेब सोनवणे, दिपक आदमाने, ईद्रिस परसुवाले, शत्रुघ्न मगर, दत्ता घुले, गोपाल चित्राल, जावेद अली, योगेश पाटिल, गणेश चांदोडे आदींची उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा