जालना शहरातील रहेमानगंज येथील हमजा किराणा दुकानाचे नवीन एमआयडीसी फेज 2 मधील एकतानगर शिवा धाब्याजवळील गोदामाला शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत किराणा सामान व इतर एैवज असा लाखोचे एैवज जळून खाक झाला आहे. ही घटना 26 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता घडली.
या आगीमध्ये गोदामातील शॉम्पु, डायपर, नमकीन, बिस्कीट, कॉसमेटीक, बिस्कीट, डिओ स्प्रे, इलेक्ट्रीक वायरिंग, सिलींग, पीयुपी असा एैवज जळून कोळसा झाला. आगीची माहिती सकाळी 7 वाजता हमजा किराणा दुकानाचे संचालक सिराज हमजा शेख यांना मिळाली. त्यांनी तात्काळ जालना अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना माहिती दिली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून, 2 तासात सकाळी 9 वाजेपर्यंत आग विझविली. सुदैवाने यात कुठेही जीवीत हानी झाली नाही.
तर लाखोचा एैवज जळून मोठे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्यसासह विनायक चव्हाण, फायरमन किशोर सकट, अशोक गाढे आदिंनी सहकार्य केले. याबाबत रात्री उशिरा चंदनझिरा पोलिस ठाण्यात जळीताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.