महिल बचत गटाला मिळालेल्या यंत्र सामुग्री चे उदघाटण

गणेश शिंदे,विरेगाव दि.3
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील भिम गर्जना महीला बचत गटाला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिळालेल्या विविध मशिनरीचे उद्घाटन उप संरपच रहीम शेख, डॉ. प्रमोद वरखडे,तालुका व्यवस्थापक सुजित बहीवल, प्रभाग संघ अध्यक्षा शांताबाई जाधव,यांच्या हस्ते करण्यात आले.
बचत गटाच्या महीलाना उधोग व्यवसाय उभारण्यासाठी
मिल,मिरची कांडप,पिठाची गिरणी,शेवया मशिन व पॅकेजिंग मशिन या साहीत्याचे
भिमगर्जना बचत गटाची मानव विकास मिशन अंतर्गत देण्यात आले
महीलांना स्वयं रोजगार व स्वावलंबन देत स्थानिक स्तरावर दर्जेदार उत्पादन करुन रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उमेद अभियानाचे तालुका समन्वयक श्याम खोंड यांनी सांगितले. यावेळी समन्वयक निलेश तायडे,प्रभाग समन्वयक राहुल इंगळे, पद्माकर झरेकर, निळकंठ भानुसे व संघ व्यवस्थापक कविता शिंदे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. भिमगर्जना बचत गटाच्या अध्यक्षा रमाबाई जाधव यांनी आभार मानले.यावेळी कार्यक्रमाला परिसरातील बचत गटच्या महीला, गावातील उपस्थित होते