
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
महाराष्ट्रात सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उरण मध्ये पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरा करण्याची गावोगावी पद्धत आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे उरण मध्ये शेकापचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून भव्य “दहीहंडी-२०२४” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाच, सहा आणि सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. पिरकोन येथील वाघेश्वर गोविंदा पथकाने गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल उरण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चार थराची सलामी देऊन उपस्थित सर्व पोलीस अधिकारी वर्गाला सन्मान दिला. सदर दहीहंडी फोडण्याचा मान वाघेश्वर मित्र मंडळ पिरकोनने पटकावले.
यावेळी पनवेलचे आदर्श माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, शेकाप रायगड जिल्हा खजिनदार प्रितम म्हात्रे,महादेवशेठ बंडा, नरेशशेठ घरत,एल बी पाटील सर, काका पाटील, रमाकांत पाटील, विकासशेठ नाईक, शेखर पाटील,सीमाताई घरत, रमाकांत म्हात्रे, रवी घरत आणि शेकाप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला.