महावंदना देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली साजरी

जालना/प्रतिनिधी, दि.14
तक्षशिला बुद्ध विहार समर्थ नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती रात्री बारा वाजता महावंदना घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची,स्पर्धा, डान्स स्पर्धा, भीम गीत गायन स्पर्धा, अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्सव समितीचे आयोजक पॅंथरचे संदीपभाऊ खरात व प्रमुख पाहुणे म्हणून शशीभाऊ घुगे (नगरसेवक)पप्पू जाधव (नगरसेवक )वैष्णवी सर जीवनराव सले (नगरसेवक), रिपब्लिकन सेनेचे डॉ.सुशील सूर्यवंशी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे, पवार बाबा यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सर्व प्रमुख पाहुण्यांनी प्रतिमा पूजन केले . तक्षशिला बुद्ध विहार उत्सव समितीचे आयोजक माननीय संदीप भाऊ खरात, अध्यक्ष विशाल वाघमारे, उपाध्यक्ष आकाश शरणागत,व प्रेम शिंदे सचिव अजय हिवाळे, सहसचिव सोमेश जोगदंड व सोहम काकडे कोषाध्यक्ष अनिकेत म्हस्के,कार्याध्यक्ष सुशांत म्हस्के उपस्थित होते